Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

नगर रस्ता शंभर टक्के वाहतुक कोंडी व सिग्नल मुक्त होणार,आमदार सुनिल टिंगरे यांचा दावा,दुचाकी रॅलीच्या माध्यमातून वडगाव शेरीतील मतदारांशी टिंगरे यांनी साधला संवाद,

पुणे : प्रतिनिधी
नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी पर्यंतचा वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी काढण्याबरोबरच उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे नगर रस्ता लवकरच शंभर टक्के सिग्नल मुक्त होणार असल्याचा दावा वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल टिंगरे यांनी केला. 
      आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वडगाव शेरी भागात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार टिंगरे यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे सुरवातीपासून ही कोंडी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. बीआरटी मार्गिकेमुळे सातत्याने प्राणांतिक अपघात होत होते. तसेच, दररोजच्या वाहतुक कोंडीमुळे चाकरमान्यांना कामावर आणि घरी पोहोचताना तारेवरची कसरत करावी लागत होती. नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले होते. परिसरातील उद्योग व्यवसायांना त्याचा फटका बसत होता. त्यामुळे थेट विधी मंडळात आवाज उठवून आणि महापालिका व वाहतुक पोलिसांकडे पाठपुरावा करून येरवडा ते सोमनाथनगरपर्यंतची बीआरटी मार्गिका काढण्यासाठी लढा दिला. त्यावरच न थांबता शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल व ग्रेड सेपरेट व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून तो मंजुर करून घेतला. आता त्या कामाला सुरवात झाली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शिरुर ते वाघोलीपर्यंत होणारा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत व्हावा यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर महायुती सरकारने वाघोली ते रामवाडी दुमजली उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. लवकरच या पुलाच्या कामाला सुरवात होईल. या सर्व उपाय योजनांमुळे आगामी काळात नगर रस्ता शंभर टक्के सिग्नलमुक्त होईल, असा दावा टिंगरे यांनी केला.
       या पदयात्रेला माजी नगरसेवक योगेश मुळीक, सुनिता गलांडे, संदिप जराड, ज्ञानेश्वर शिंदे, उषा कळमकर, सतिश म्हस्के, नारायण गलांडे, महेंद्र गलांडे, माजी सरंपंच भिकोबा गलांडे, संगम शंकर, मुकुंद गलांडे, महेश गलांडे, अनिल नवले, राकेश परदेशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठीक ठिकाणी मतदारांनी उत्साहाने आमदार टिंगरे यांचे स्वागत करीत त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले....

Post a Comment

0 Comments