राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)गटात प्रवेश करते वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत प्रकाश(आप्पा)म्हस्के,रेखा टिंगरे,अंकुश काकडे,चंद्रकांत टिगरे,
पुणे_प्रतिनिधी_वडगाव शेरीत महायुतीचा बालेकिल्ला म्हणून पाहिल्या जाणाऱ्या व ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील धानोरी प्रभाग एकच्या मा.नगरसेवका रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)गटात प्रवेश केल्याने त्यांच्या रूपाने मतदार संघात महायुतीला खिंडार पडले असून यामुळे विरोधकांचे दाबे देखील दणाणले आहेत.
सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेक उमेदवार एकमेकावर आरोपाच्या फैरी झाडत असतानाच शहरात देखील निवडणुकीचे वातावरण गरम असताना वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात जरी सोळा उमेदवार रिंगणात असले तरी पण या ठिकाणी खरी लढत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असतानाच या ठिकाणी महायुतीला एका मागून एक धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे.कारण राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)गटात उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काही माजी नगरसेवक व कार्यकर्ता यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटात पवार यांच्या उपस्थितीत खराडी भागात काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार यांच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात पठारे यांनी जाहीर प्रवेश केला होता.यावेळी येरवडा प्रभागातील माजी नगरसेवक हानिफ शेख यांनी देखील या गटात प्रवेश केल्याने या मतदार संघात हा चर्चेचा विषय बनला असतानाच महायुतीला एक प्रकारचा दे धक्काच बसला होता.
याला काही दिवसांचा अवधी उलटत नाही.तोच महायुतीतून बाहेर पडण्याचे सत्र एका मागोमाग घडत असतानाच इतर पक्षात अनेकांच्या प्रवेशामुळे धक्के बसत असताना आता राज्यासह या मतदार संघात देखील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाकर फिरवली असून धानोरी प्रभाग क्रमांक एकच्या कार्यक्षम नगरसेविका म्हणून पाहिले जात असलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी देखील ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे या प्रभागातून महायुतीला टिंगरे यांच्या रूपाने दे धक्का देण्याचे काम पवार गटाने करून या प्रभागातच नाही तर संपूर्ण मतदार संघात खिंडार पाडल्याची चर्चा मतदार वर्गात रंगली आहे.अगोदरच पवार यांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी घेतलेल्या सभांना उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळून अनेकांनी खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर या मतदार संघात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्याचे उदाहरण ताजे असताना आता शहरासह उपनगर भागात शरदचंद्र पवार यांनी पाय रोवण्यास सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागासह शहरात देखील पक्षाची ताकद वाढण्यास त्यांच्या रूपाने मदत मिळणार असून एकदा पवार यांनी राजकीय भाकर फिरविण्यास सुरुवात केल्यावर त्यांचा कोणी ही राजकीय नेते हात धरू शकत नसल्याचे बोलले जात असून अनेक राजकीय नेते पवार गटात येणार असल्याचे बोलले जात असून रेखा टिंगरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांची ताकद वाढण्यास रेखा टिंगरे यांच्या रूपाने मदत मिळणार आहे.या गटात येण्यापूर्वी त्या भाजप पक्षात होत्या.मात्र ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा सुखद दे धक्का दिला आहे.विशेष म्हणजे टिंगरे यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी या मागील पालिका निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चीत करून कात्रजचा घाट दाखवून या प्रभागात तीन वेळा निवडून येण्याचा मान मिळविला असल्यामुळे प्रभागात त्यांची वैयक्तिक ताकद किती आहे.हे विरोधकांना सांगण्याची गरज नसून तीन ही वेळेस पालिका निवडणुकीत विरोधकांनी त्यांचा पराभव करण्याचा आतोनात प्रयत्न करून ही त्यांनी त्यावर मात करून विजय प्राप्त केला आहे.त्यामुळे विरोधक त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नसून त्यांच्या पुढे टिंगरेंच्या प्रवेशामुळे एक प्रकारची डोकेदुखी वाढली आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळातच रेखा टिंगरे यांनी शरद पवार गटात उडी घेऊन प्रवेश घेतल्याने सर्वांना सुखद आश्चर्याचा धक्का देऊन आता पुन्हा त्यांच्या रूपाने विरोधकांना त्यांनी कात्रजचा घाट दाखविला असल्याचे त्यांच्या प्रवेशामुळे दिसून येत असून त्यांनी योग्यवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे धानोरी प्रभागातून बापूसाहेब पठारे मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नसून प्रभागातील इतर राजकीय नेत्यापेक्षा रेखा टिंगरे प्रभागात मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून पठारे यांची ही जमेची बाजू असून त्यांनी प्रभागात केलेल्या विविध विकासकामांची पावती आत्तापर्यंत झालेल्या पालिका निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या पारड्यात टाकली आहे. त्यांच्या या अचानक पक्षात येण्याच्या भूमिकेमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट होऊन पक्षाची या प्रभागात ताकद वाढवून त्यांच्या रूपाने प्रभागातून पठारे यांना अधिक मताधिक्य मिळण्यास मदत मिळणार आहे.त्यांच्या प्रवेशादरम्यान शरद पवार यांचे विश्वासू प्रकाश(आप्पा)म्हस्के, पक्षाचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे,टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे,माऊली टिंगरे आदी यावेळी उपस्थित होते.अनेकांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे टिंगरे यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीचे पारडे जड झाले आहे.___
Post a Comment
0 Comments