पुणे प्रतिनिधी :- नागेश देडे
धानोरी प्रभाग क्रमांक एकच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पतीवर तीन ते चार हल्लेखोरांनी प्राणघातक भ्याड हल्ला केल्याचा प्रकार मंगळवार(दी.१८)रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास धानोरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालय समोर घडला.हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी चंद्रकांत टिंगरे,
या हल्ल्यात चंद्रकांत टिंगरे(वय५५वर्षे, रा.धानोरी)असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार टिंगरे यांचे धानोरी _लोहगाव मार्गावर महावितरण कार्यालय लगतच मंगल कार्यालय असून ते काही कामानिमित्त कार्यालयात आले असताना ते त्यांचे काम करून त्यांची चारचाकी वाहन क्रमांक(एमएच_१२_डीएस_७७)या वाहनातून दुपारी३.३०चा सुमारास घरी निघाले असताना दोन दुचाकीवर तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी येऊन सर्वात प्रथम समोरून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.हल्ला होत असल्याचे टिंगरे यांच्या लक्षात येताच ते बचावासाठी गाडीतून बाहेर पडताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात तसेच कंबरेवर लाकडी बांबू व ब्लॉक ने प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर तात्काळ घटनास्थळापासून पसार झाले आहेत.यापूर्वी देखील दहा वर्षापूर्वी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अशाच प्रकारे हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे घटनेचा प्रकार दुसऱ्यांदा त्यांच्यावर घडल्याने या भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.काही दिवसापूर्वीच रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटात प्रवेश केल्याने झालेला हल्ला हा राजकीय वैमनस्यातून झाला की,भावकीच्या वादातून झाला हे स्पष्ट समजू शकले नाही.कारण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ल्याचा प्रकार दिवसाढवळ्या भर चौकाच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने या भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. टिंगरे यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण त्यांची परिस्थिती पाहून लगेच पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.यावेळेस माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या पतीवर हल्ला होण्याचा दुसरा प्रकार घडल्यामुळे विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे हा भ्याड हल्ला करण्यात आला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की,झालेली घटना अतिशय चुकीची असून या घटनेतील हल्लेखोरांना अटक केल्यावर सत्य काय?आहे ते बाहेर येईल.त्यामुळे संबंधित घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली यावेळी रुग्णालय बाहेर बाबासाहेब गलांडे,सुनील खांदवे आदी पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
घटनेची माहिती समजताच पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,परिमंडळ४चे पोलीस उपायुक्त हिम्मतराव जाधव,खडकी विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.परिसरात पोलीस बंदोबस्तामुळे या भागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते...
Post a Comment
0 Comments