पुणे प्रतिनिधी :- दि.१२/११/२०२४ रोजी खराडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे व स्टाफ असे खराडी पोलीस ठाणेच्या हद्दीत विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषांगने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे आदित्य अतिश मोहिते वय २१ वर्षे रा. रामवाडी, येरवडा पुणे हा खराडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये ईवॉन आय. टी. पार्क, फेज-२, खराडी, पुणे येथे पिस्टल घेवून येणार आहे.
अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो.स्टे श्री. संजय चव्हाण यांना सदरची मिळालेली बातमी कळविली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बातमीचे ठिकाणी सापळा रचुन त्याला शिताफीने पकडले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला पँटचे आतून गावठी कट्टा लावल्याचे व पॅन्टचे उजवे खिशात दोन राऊंड ठेवल्याचे दिसल्याने ते पोलीसांनी ताब्यात घेतले व त्याला अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पो.स्टे. पुणे शहर, श्री संजय चव्हाण सहा.पो.नि. सिध्दनाथ खांडेकर, तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे, पोलीस अंमलदार- महेश नाणेकर, अमोल भिसे, सचिन घोलप, प्रफुल मोरे, अमोल जाधव, सचिन पाटील, श्रीकात कोद्रे, व सुरज जाधव, यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments