Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

विश्रांतवाडीतून पठारेंना मताधिक्य मिळून देणार,राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भोसलेंचा विश्वास

पुणे_प्रतिनिधी_
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार)गटाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विश्रांतवाडी भागातून मोठे मताधिक्य मिळून देण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस विशाल भोसले यांनी व्यक्त केला.
      सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.त्यातच या मतदार संघात वडगाव शेरीसह,खराडी,रामवाडी,येरवडा या भागासह विश्रांतवाडी,कळस या भागाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला असला तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार)गटाचे व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विश्वासू प्रकाश(आप्पा)म्हस्के कळस भागात स्थायिक असल्यामुळे या भागातून प्रकाश(आप्पा)म्हस्के यांच्या रूपाने पठारे यांचे पारडे जड मानले जात आहे.कारण या भागात प्रामुख्याने राज्यासह परराज्यातील मतदार वर्ग स्थायिक झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून
       कार्यकर्त्यांसह पक्षाचे शहर सरचिटणीस विशाल भोसले
कळससह,विश्रांतवाडी,स.न.११२,११३,वडार वस्ती,भीमनगर,कस्तुरबा गांधी सोसायटी(बी)या भागातील मतदार वर्ग असून प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम,दलित,ओबीसी,मागासवर्गीय,मातंग,भाट आदी असलेला बहुजन समाज हा प्रकाश (आप्पा)म्हस्के यांना मानणारा वर्ग असून  या भागात जवळपास बारा ते तेरा हजार मतदार वर्ग असल्याने या भागातील जबाबदारी ही पक्षाचे शहर सरचिटणीस विशाल भोसले यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असल्यामुळे ते दररोज परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात प्राधान्य देण्याचे सांगत असल्यामुळे मतदारांचा देखील त्यांच्यावरील विश्वास अधिक बळकट होऊन ज्या उमेदवाराच्या पाठीशी प्रकाश(आप्पा)म्हस्के यांचा आशीर्वाद आहे.अशा उमेदवारालाच आम्ही मतदान करणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असल्यामुळे या भागातून पठारे यांना जवळपास दहा ते अकरा हजार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पठारे यांची बाजू देखील अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून यामुळे त्या दृष्टीने विशाल भोसले यांनी देखील दंड थोपटून मतदारांच्या असलेल्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे.त्यातच या भागातील माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार गटात प्रकाश (आप्पा)म्हस्के यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.तर मनसेच्या माजी नगरसेविका सविता उर्फ सुनीता साळुंके यांच्यासह त्यांचे पती अनिल साळुंके,दिर नटराज साळुंके यांनी देखील पठारे यांना पाठिंबा दर्शवून ते त्यांच्या पदयात्रेसह अनेक सभांनी सहभाग घेत असल्यामुळे या भागातून पठारेंचे हात अधिक बळकट झाले आहेत.त्यातच प्रभागात पक्षाचे शहर सरचिटणीस विशाल भोसले हे घेत असलेले परिश्रम दिसून येत असल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांची असलेली बाजू अधिक बळकट होऊन त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.__

Post a Comment

0 Comments