पुणे_प्रतिनिधी_
गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून विकासकामांचा कांगावा करणाऱ्या विरोधकांना मतदानाच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन दिपाली पठारे(गव्हाणे)यांनी केले.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ धानोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठक सभेत महिलांशी संवाद साधताना गव्हाणे ह्या बोलत होत्या.यावेळी मराठवाडा महिला संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष भालचंद्र कसबे,माजी नगरसेवक सुनील मलके,वृषाली वाघमारे,जया मुखनाक,मिरा कांबळे,सुमित्रा पवार,वसुंधरा महिंद्रकर,प्रीती बोराटे,सारिका वाघमारे,शीतल शिनगारे,विद्या चाटे,वर्षा हावळे,स्मिता पोटेकर,ज्योती गायकवाड आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.यादरम्यान बापूसाहेब पठारे यांना मराठवाडा महिला संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्याात आला.
पठारे(गव्हाणे)म्हणाल्या की,गेल्या पस्तीस वर्षापासून पठारे हे राजकारणात असून त्यांनी राजकारणाला महत्व देण्यापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कसे सोडविता येतील.या गोष्टीला विशेष प्राधान्य दिले आहे.यापूर्वी खराडी भागात माळरान परिसर असल्यामुळे परिसरात एक गुंठा जागा घेण्यास देखील नागरिक टाळत असताना पठारे यांना जनतेचा व तरुण वर्गाचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सतावत होता.त्यामुळे असलेला प्रश्न लवकर सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन या भागात जे आयटी पार्कचे जाळे पसरविल्यामुळेच आज देशाच्या कानाकोपऱ्यात वडगाव शेरी मतदार संघाचे नाव नावारूपास आले असून आज महिला व तरुणांना नोकरीसह व्यवसायाचे संधी मिळाल्या आहेत.त्यामुळे यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
तर पंधरा वर्षापूर्वी मतदार संघातील नागरिकांना विशेष करून महिलांना एका पाण्याच्या थेंबासाठी रात्र जागून काढण्याची वेळ येत होती.हा मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी हांडे मोर्चे काढून अनेक लाठीचार्ज त्यांनी अंगावर घेतल्यामुळे या भागात लष्कर,बंडगार्डन व होळकर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असून विश्रांतवाडी,धानोरी,लोहगाव व वाघोली या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड येथून पाणी आणण्यास त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्याच कालावधीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत महायुतीची सत्ता मतदार संघात असताना देखील ते जनतेचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरल्याची शोकांतिका आहे.दहा वर्षे यांची सत्ता असताना देखील जे जनतेचे प्रश्न सोडवू शकले नाहीत ते भविष्यात काय?विकास करणार असा घणाघात आरोप पठारे(गव्हाणे)यांनी केला.याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून बेरोजगार महिलांना रोजगार मिळून देण्यात ही पठारे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले.यावेळी महिलांनी राम कृष्ण हरी वाजवा तुतारीचा नारा दिल्याने परिसर दुमदुमून आम्ही अखेरपर्यंत बापूसाहेब पठारे यांनाच साथ देणार असल्याचे महिलांनी बैठक सभेत जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भालचंद्र कसबे यांनी मानले._&&&&फोटो ओळ_&&१,२)मराठवाडा महिला संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत दिपाली पठारे(गव्हाणे),३)दिपाली पठारे यांचे स्वागत करताना मराठवाडा महिला संघटनेच्या महिला पदाधिकारी
Post a Comment
0 Comments