बंडगार्डन भागात धडक कारवाई करुन १२,७४,२००/-रूकि.चा गांजा हा
अंमली पदार्थ जप्त
मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने दि.२९/१०/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार ०१/३० वा. आगरकर नगर पुणे रेल्वे स्टेशन येथे १) मानश कुमार स्वाईन, वय ३८ वर्षे, रा. हरीहरुपर, जिल्हा नयाघर, ओरीसा २) लालमोहन फ्रान्सींस बिर, वय ३४ वर्षे, रा. अतंराबा जिल्हा गजपती, राज्य ओरीसा ३) श्रीकांत अभिमन्यु बिरा, वय ३७ वर्षे, रा. मोहना जि. गजपती, राज्य ओरीसा यांच्या ताब्यातुन एकुण १२,७४,२००/- रु ६१ किलो ६० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीं विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं.३२०/२०२४, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, युवराज कांबळे, सय्यद साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments