Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

वडगावशेरीत कणकवली पॅटर्न राबविणार का?,महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे,तिरंगी सामना रंगण्याची दाट शक्यता,

पुणे_सोमनाथ साळुंके
मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनाच नव्हे तर जाणकारांना धक्का देणाऱ्या कणकवली  विधानसभा निवडणुकीत महायुतीतील उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याने या निवडणुकीत देखील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात पुन्हा कणकवली विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊन राष्ट्रवादी(ap) गटाचे व भाजपचे उमेदवार यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार का?या चर्चेला उधाण येऊन या मतदार संघाने पूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
        सध्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असल्यामुळे महायुती व महाआघाडी पक्षाच्या वतीने राज्यातील विविध मतदार संघासह वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी पण हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस(ap)गटाला जाहीर झाल्याने येथून पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या व भाजपला मतदार संघ सोडण्यात न आल्याने पक्षाचे माजी आमदार जगदिश मुळीक तसेच पदाधिकारी यांच्यात नाराजीचे सूर उमटल्याचे वातावरण सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे.मात्र कसल्या ही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा चंगच मुळीक यांनी बांधल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागली आहे.त्यातच मतदार संघात मुळीक यांना मानणारा वर्ग असून पदाधिकारी हे तळागाळातील मतदारांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे.
       त्यातच सध्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात मुळीक यांना पक्षाकडून ऐन मोक्याच्या वेळेस उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.याचेच उदाहरण म्हणजे मागील २०१९साली राज्यातील झालेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत शिवसेना_भाजप पक्षाची युती असताना हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आला होता.त्यावेळेस सेनेकडून सतीश सावंत व काँग्रेस कडून सुशील राणे हे निवडणुकीच्या रिंगणात एकमेका विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.त्यामुळे या ठिकाणी होणारी लढत एकतर्फी होणार असल्याचे मतदार वर्गामध्ये बोलले जात असताना भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या गटात विचारविनिमय सुरू असतानाच निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी असतानाच ऐन मोक्याच्या क्षणी भाजपकडून पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर होताच नितेश राणे राणे यांनी त्यावेळेस विरोधी उमेदवारांचा जवळपास २८हजार११६मतांनी पराभव करून कणकवली मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकविण्यास यश मिळविले होते.
       याबरोबरच लोकसभा निवडणुकीत शहरातून भाजपकडून प्रबळ दावेदार म्हणून मुळीक यांच्याकडे पाहिले जात होते.मात्र त्यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजीचे सूर उमटत असतानाच आता विधानसभा निवडणुकीत देखील हा मतदार संघ मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(ap)पक्षाला सोडण्यात आल्याने पक्षाच्या पदाधिकारी यांच्यात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.त्यामुळे मुळीक यांनी देखील आत्ता नाही तर कधीच नाही हा विचार मनाशी बाळगून त्यांनी या मतदार संघातून पुन्हा उमेदवारी मिळावी.या उद्देशाने दिल्ली,मुंबईवारी जरी सुरू ठेवली असली तरी पण त्यांच्या प्रयत्नांना किती यश येईल.हे येणारा कालावधीच ठरवणारा असला तरी पण मागील पंचवार्षिक निवडणूक प्रमाणेच मागील निवडणुकी प्रमाणेच या मतदार संघात मुळीक यांना उमेदवारी देण्याची चाल जर खेळून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले तर पुन्हा कणकवली विधानसभा मतदार संघात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीची पुनरावृत्ती या मतदार संघात झाली तर पक्षातील पदाधिकारी यांच्यासह मतदारांना देखील यात आश्चर्य वाटायला नको.त्यातच उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचे दोनच दिवस शिल्लक असून मुळीक यांना उमेदवारी जाहीर झाली तर कणकवली मतदार संघाप्रमाणेच वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात पुन्हा मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसून वडगाव शेरी भागात पुन्हा मतदार संघात २०१४ची पुनरावृत्ती होऊन या तीन ही आजी_माजी आमदारांमध्ये तिरंगी सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून निवडणुकीच्या राजकारणाची गणिते बदलून मतदार संघावर कोणता उमेदवार बाजी मारणार?याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता याचा निर्णय मिळणाऱ्या उमेदवारी अर्जामुळेच येत्या दोन दिवसात कळेल.हे मात्र निश्चितपणे बोलले जात आहे यासंदर्भात माजी आमदार जगदिश मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,याबाबत आपणास कळवितो.तर विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.._

Post a Comment

0 Comments