वडगावशेरी मतदार संघामधील निवडणूक आखाड्यातील फड जिंकण्यासाठी राज ठाकरेंची मनसे सेना सज्ज झाली असून मतदार संघात युवा चेहरा म्हणून पाहिले जाणारे कौशल घोलप यांना पक्षाने संधी दिल्यास विरोधकांवर त्यांच्या रूपाने कडवे आव्हान उभे करून मतदार संघाचे चित्र पालट विण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने या ठिकाणी मनसेचे इंजिन धावण्यास संधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा मतदारासह पक्षातील कार्यकर्त्यात रंगली आहे.
२००९साली नव्याने तयार झालेला वडगाव शेरी मतदार संघ व त्याच कालावधीत स्थापन झालेला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा मतदारांना नवखा असताना देखील पंधरा वर्षापूर्वी कामाच्या माध्यमातून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवलेली वचक यामुळे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी या भागातून माजी नगरसेवक राजेंद्र एंडल यांना उमेदवारी दिल्यावर त्यावेळेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी अन्याय विरोधात उठविलेल्या आवाजामुळे मतदारांना पक्ष नवखा असताना देखील या ठिकाणी एंडल यांनी ३५हजारांचे मताधिक्य घेतल्यामुळे पक्षाची असलेली ताकद दिसून आली होती.पण मध्यंतरीच्या काळात पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला पूर्वीसारखा ताजेपणा दिसून येत नसल्याने थोडीशी उतरती कळा लागली होती.
पण कार्यकर्त्यांची झालेला मारगल्पणा दूर करण्यासाठी पक्ष प्रमुखांनी कंबर कसून बैठकीसह सभा,मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात ताजेपणा येऊन ते पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.याचबरोबर राज्यातील विरोधकांना शह देण्यासाठी पक्ष प्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असतानाच काही दिवसापूर्वीच शहरातील पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीनंतर कोथरूड व हडपसर या भागातून किशोर शिंदे व साईनाथ बाबर यांना उमेदवारी जाहीर झाली असतानाच पक्षातील राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या वडगावशेरी मतदार संघाकडे लक्ष लागून राहिले आहे.मतदार संघातून अनेक मातब्बर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असताना सर्वात प्रथम नाव चर्चेत आले ते कौशल घोलप यांचे सध्या घोलपांचे नाव आघाडी असून त्यांचे कामाचे स्वरूप पाहिले तर पक्ष प्रमुख राज ठाकरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेचे मुख्य प्रश्न सोडविण्यावर भर दिल्यामुळे ते आज उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची देखील हा गड काबीज करण्यासाठी मोलाची साथ लाभणार असल्यामुळे त्यांची असलेली ताकद देखील मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.सध्या मतदार संघात तिरंगी निवडणूक होण्याचे वातावरण जरी निर्माण झाले असले तरी पण घोलप यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर मतदार संघातील अनेकांचा असलेला पोल हे फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घोलप यांची असणारी कामाची पध्दत ही वेगळी असून पंधरा वर्षाच्या कालावधीत मतदार संघात पुलाखालून पाणी गेल्याने व मतदार संघातील विकासकामांच्या बाबतीत हा भाग कोरडाच राहिल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत असतानाच पक्षाने या भागातून घोलप यांच्या रूपाने युवा चेहर्यास संधी दिल्यावर विरोधकांचे देखील धाबे दणाणले जाणार आहेत.विशेष म्हणजे घोलप यांनी तळागाळातील नागरिक अथवा कार्यकर्त्यापर्यंत पोहचून त्यांचे असणारे समस्या सोडविण्यावर प्राधान्य दिले आहे.
तर बेरोजगार तरुण व महिलांना रोजगार कशा पध्दतीने मिळेल यासाठी त्यांचे असणारे कार्य जोमाने सुरू आहे.आज मतदार संघातील तरुणपिढी वाम मार्गाला जाऊन व्यसनाधीन झाल्याचे चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे.यामुळे भविष्यात युवा पिढी व्यसनामुळे बरबाद होऊ नये.याकरिता घोलप हे अनेकजण व्यसनापासून मुक्त व्हावेत याकरिता ते युवकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण आकर्षित झाल्याने कार्यकर्त्यांचा फौजफाटा देखील मतदार संघात वाढल्याचे दिसून येत आहे.तर सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा हातभार लाभत आहे.दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी राज्यातील तीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये अनेक युवा उमेदवारांना संधी देण्यात आल्यामुळे मतदार संघांमधील कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच जर कौशल घोलप यांच्या गळ्यात पक्षाने उमेदवारीची माळ घातली तर ते खरोखरच पक्ष प्रमुखां चा विश्वास सार्थ ठरविण्यात यशस्वी होतील.त्यामुळे मतदार संघात आता जरी तिरंगी अथवा चौरंगी लढत होण्याचे चित्र दिसून येत असले तरी पण कौशल घोलप यांच्या रूपाने पंचरंगी लढत होऊन ह्या मतदार संघाचा गड काबीज करण्यासाठी पक्षाला मोठ्या प्रमाणात संधी असल्याची जोरदार चर्चा मतदार संघातील मतदारांमध्ये रंगली आहे.त्यामुळे मतदार संघात कौशल घोलप यांचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर विरोधकांची असणारी डोकेदुखी वाढणार हे स्पष्टपणे जाणवत आहे.तर त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.त्यामुळे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात काटे की टक्करची लढत होणार हे निश्चितपणे जाणवत असून मतदार संघात आता मनसेचा विजयाचा गुलाल उधळणार का?याची उत्सुकता मतदारांना लागून राहिली आहे.
Post a Comment
0 Comments