पुणे_सोमनाथ साळुंके
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
रॅलीत सहभागी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे,
सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे राज्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांनी दोन दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यावर कल दिला असून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी व महायुतीकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्याने होणाऱ्या निवडणुकीत आजी माजी आमदारांमध्ये चुरशीचा सामना होणार असल्याचे निश्चित मानले जात असून राष्ट्रवादी काँग्रेस(एसपी)गटातून माजी आमदार बापूसाहेब पठारे तर राष्ट्रवादी काँग्रेस (एपी)गटातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असून मंगळवार दि.(२९)या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी सकाळच्या दरम्यानच दोन्ही उमेदवारांच्या वतीने मतदार संघात भव्य अशी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांचा व वाहनांचा असलेल्या ताफ्यामुळे अनेक वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
कार्यकर्त्यांच्या घोष्णाबाजीमुळे परिसर दुमदुमून निघाला होता.येरवडा क्षेत्रीय कार्यालयात प्रथम विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी देखील अर्ज दाखल करून तो निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आला.परिसरात काही अनुचित घटना घडू नये.याकरिता परिमंडळ ४पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.दोन्ही उमेदवारांनी काढलेल्या रॅलीमुळे मतदार संघातील विविध नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते.दोन्ही उमेदवारांच्या रॅली मध्ये पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.दोन्ही उमेदवारांची रॅली ही शांततेत व उत्साहात पार पडल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत होते.क्षेत्रीय कार्यालय बाहेर वाहनांच्या लांबवर रांगा लागून बहुतांश प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.मात्र वाहतूक पोलिसांनी असलेली कोंडी तात्काळ सोडविल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.__
Post a Comment
0 Comments