Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

वडगावशेरीत पराभवाचा वचपा काढणार कोण?आजी _माजी आमदारामध्ये काटे की टक्कर

पुणे_सोमनाथ साळुंके
वडगावशेरी विधानसभा निवडणुकीत ऐन मोक्याच्या वेळेस भाजपचे जगदिश मुळीक यांनी माघार घेतल्यामुळे या मतदार संघात आजी_माजी आमदारामध्येच काटे की टक्करची लढत होऊन चुरशीचा सामना जरी होणार असला तरी पण दहा वर्षापूर्वीच्या पराभवाचा वचपा कोण?काढणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.
       सध्या हा मतदारसंघ यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर झाल्यामुळे शरदचंद्र पवार गटातून बापूसाहेब पठारे तर अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या उमेदवारात चुरशीची लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले होते.मात्र भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा मतदार संघात रंगल्यामुळे अनेक राजकीय जाणकारांचा जीव भांड्यात पडला होता.त्यामुळे मतदार संघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे बोलले जात होते.मात्र मुळीक यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास काही कालावधी शिल्लक असतानाच पक्षश्रेष्ठीकडून माघार घेण्याचा आदेश आल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत.
         त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बापूसाहेब पठारे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे हे दोघे आजी_माजी आमदार आमने सामने उभे आहेत.पण या दोन्ही उमेदवारांचा दहावर्षापूर्वी २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना झालेल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.२००९साली नव्याने जाहीर झालेल्या या मतदार संघावर शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या मतदार संघावर प्रथमच त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यास यश मिळविले होते.मात्र २०१२साली झालेल्या पालिका निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे आमदार सुनील टिंगरे यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी त्या निवडणुकीत बंडखोरीचा पावित्रा घेत पालिका निवडणुकीत उडी घेतली होती.मात्र त्यावेळेस त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता.
     त्यामुळे झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टिंगरे यांनी २०१४साली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेत उडी घेऊन मतदार संघावर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.त्यावेळेस त्यांचे परस्पर विरोधक माजी आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर माजी आमदार जगदिश मुळीक हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.त्यावेळेस या दोन्ही उमेदवारांना पराभवाची धूळ चारत मुळीक यांनी प्रथमच या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडक विण्यास यश मिळविले होते.त्यावेळेस टिंगरे हे दुसऱ्या तर पठारे हे तिसऱ्या क्रमांकावर होते.पण या घटनेला आता दहा वर्षे लोटली असल्यामुळे बरेचसे पाणी पुलाखालून मुरले गेले आहे.
      सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना या दोघांना मतदार संघाचा असलेला अभ्यास हा चांगल्या प्रकारे माहिती असून या ठिकाणी राजकारणाची गणिते कशा प्रकारे जुळविता येतील यात दोघे ही मातब्बर असून दोनच दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी पठारे व टिंगरे यांनी रॅली काढून केलेल्या शक्तिप्रदर्शनात आपली असलेली ताकद दाखवून दिले आहे.त्यामुळे दोन्ही उमेदवारांना कमी लेखून चालणार नाही.त्यामुळे सध्या तरी दोन्ही उमेदवारांचे पारडे मतदार संघात जड असून कोण?कोणाला चितपट करेल हे सांगणे जरी कठीण असले तरी पण दहा वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यास दोन्ही उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचवून त्यांनी एकमेकाविरोधात लढण्यासाठी दंड थोपटून कंबर कसली असल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी राजकारणाचे डावपेच खेळण्यास सुरुवात करून टिंगरे व पठारे यांची कसोटी या निवडणुकीत पणाला लावण्याची वेळ आल्याने मतदार संघावर कोणता उमेदवार बाजी मारून विजयाचा गुलाल उधळणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले असले तरी पण याचा निर्णय येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल हे मात्र निश्चित मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments