Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

घरचोरी करणा-या चोराच्या आवळल्या मुसक्या

 पुणे प्रतिनिधी :- न्यू स्टार न्यूज इंडिया 
 घरचोरी करणा-या चोराच्या आवळल्या मुसक्या
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं ३१७/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करीत असताना दि.०२/१०/२०२४ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय बादरे, अमजद शेख, वामन सावंत व किशोर भुसारे यांना त्यांचे खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हा गुन्हा करून तो सध्या त्याचे गावी मोघा ता. उदगीर, जि. लातूर येथे असले बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.
सदर आरोपीचा लातूर येथे जावून शोध घेतला असता तो त्याचे घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शेखर संभाजी जाधव वय २५ वर्षे, रा.मु.पो.मोघा,
ता. उदगीर, जि. लातूर असे सांगीतल्याने त्यास चौकशीकामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता त्यास अधिक विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्याचेकडे केलेले अधिकचे तपासामध्ये त्याचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल पॉवर बैंक व कार चार्ज असा १,४३,४५०/- रुपयाचा माल हस्तगत केला असून आरोपीकडे त्यास विश्वासात घेवून तपास केला असता त्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, चंदननगर पोलीस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल, भोसरी पोलीस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल असा एकुण २,४२,५००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलीस स्टेशन कडील एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ४. श्री. हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शंकर साळुंखे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments