ऐन सणासुदीच्या काळात विश्रांतवाडीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत असल्यामुळे निवडणूक काळात दिलेली आश्वासने हवेत विरून ती फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
उत्तर भागातून शहराचे प्रवेशव्दार म्हणून विश्रांतवाडी भागाकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे.त्यामुळे राज्यासह परराज्यातील नागरिक कामानिमित्त स्थायिक झाल्याचे चित्र प्रामुख्याने दिसून येत आहे.मध्यंतरीच्या काळात विश्रांतवाडी भागात प्रशासनाच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून जवळपास तेरा मजली इमारत उभारून या ठिकाणी जवळपास दिडशेहून अधिक कुटुंबे स्थायिक झाले आहेत.असलेली इमारत भर चौकात असली तरी पण येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात न आल्याने विशेष करून महिलांना तेरा मजली जिना उतरून येथील असलेल्या बसस्थानकावरील नळाला पाणी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याने महिलांची हंडाभर पाणी मिळविण्यासाठी कंबर मोडली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन मधील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण
तर स.न.११२वडारवस्ती येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधाच नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने राजकीय नेते व पालिका अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे.या भागासह धानोरी,कळस परसराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा.आणि नागरिकांची असलेली मुख्य समस्या दूर होण्याकरिता प्रशासनाच्या वतीने होळकर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्यात आला असताना देखील जर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत असेल.तर नागरिकांच्या कररुपी पैशातून उड्या मारणारे पालिका प्रशासनाचे अधिकारी खरोखरच जनतेचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत का?याचे हे ताजे उदाहरण आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असल्यामुळे विविध पक्षातील उमेदवार एकमेकांच्या विरोधात आरोपाची तोफ डागण्यासाठी दंड थोपटूनच उभे असून मतांची भिक मागण्यासाठी उभे असणारे उमेदवार विकास न झालेल्या कामांच्या बाबतीत आरोप प्रत्यारोप करून फैरी जाडण्याच्या तयारीत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून खैरात करणार असल्याचे जरी स्पष्ट चित्र दिसून येत असले तरी पण सध्या नागरिकांच्या पाणीटंचाईबाबत कोणाला?जाग येणार नसल्याचे दिसून येत आहे. तरी पण नागरिकांना मुद्दामहून त्रास देण्यासाठी व स्वतःकडे मते वळविण्यासाठी पाण्याचे षडयंत्र रचले गेले की,काय?याबाबत आता नागरिकांना शंका वाटू लागली आहे.त्यामुळे निवडणूक काळात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेते देत असलेली आश्वासने ही फुसका बार ठरून ती हवेत विरले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून सध्या विश्रांतवाडी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्याची अशा प्रकारची अवस्था असेल तर धानोरी,कळस भागातील नागरिकांची सद्य परिस्थिती काय?असेल हे सांगणे कठीण असून मतदार संघातील नेते व पालिका प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांचा सुरू असलेला तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे नाटक करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येऊन परिसरातील नागरिकांना टँकरने पाणी मिळविताना कसरत करूनच ते मिळवावे लागत असून अनेकांना टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ येत असल्याने पाण्याचा झरा वाहणाऱ्या या मतदार संघात पाणी मिळविण्यासाठी अशा प्रकारची अवस्था होत असेल तर यासारखी दुसरी शोकांतिका दुसरी असू शकत नसून नागरिकांचा पाण्याचा मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे._
Post a Comment
0 Comments