सध्या वडगाव शेरी मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना ऐन हिवाळ्यात देखील टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ येत असल्यामुळे आता सर्वसामान्य जनताच ठरवेल की,खरे टँकरमाफिया कोण?असा खडाजंगी सवाल माजी आमदार व महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस(sp) गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मतदार संघातील नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी खराडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेविका संजिला पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे,महादेव पठारे,सचिन भगत,भैय्या जाधव,पक्षाचे विभाग अध्यक्ष आशिष माने,आनंद गोयल आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार पठारे म्हणाले की,२०००सालानंतर राज्यासह परराज्यातील नागरिक मतदार संघात कामानिमित्त स्थायिक झाल्याने या भागात लोकसंख्येत अधिक भर पडल्याने नागरिकांना मुख्य पाणी टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येत होती.त्यामुळे नागरिकांना टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ येत असल्यामुळे असलेली मुख्य समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने मतदार संघात अनेक हांडे मोर्चे व आंदोलने करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.त्यामुळे प्रथम बंडगार्डन व नंतर लष्कर पाणी विभागाकडून या भागाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असताना विश्रांतवाडी,धानोरी,कळस या भागासाठी होळकर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करण्यात येऊन देखील सर्वसामान्य नागरिकांना सध्या ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईस जर सामोरे जाण्याची वेळ येत असेल तर यासारखी दुसरी शोकांतिका असू शकत नाही.तर लोहगाव,वाघोली या भागातील देखील पाणीप्रश्न सुटण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जलवाहिनी टाकण्यात आली आहे.पण ती देखील ठणठणीत कोरडी असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आहे.आज कार्यालयात येणारे नागरिक हे पाण्याचीच समस्या मांडत आहे.त्यामुळे याबाबत याचे सर्व कारस्थान पालिकेचे अधिकारी करत आहेत की,विरोधक करत आहे.हे समजू शकले नाही.
मात्र मी मतदार संघावर आमदारकी पदावर असताना विरोधक हे माझ्यावर टँकरमाफिया असल्याचा आरोप करत होते.मात्र सध्या वाढत्या लोकसंख्यासह टँकरमाफियांचे जाळे मतदार संघात पसरले असल्यामुळे आता खरे टँकरमाफिया कोण? हे आता जनताच ठरवेल असा घाणाघाती आरोप पठारे यांनी विरोधकांना लगावला.नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नसल्याने वेळप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असला तरी पण आचार संहिता असल्यामुळे मला आंदोलनात उतरता येणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पाणीप्रश्न बरोबरच वाहतुकीचा प्रश्न देखील भेडसावत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी खराडी ते वारजे नदीपात्रातील मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर ती समस्या देखील लवकर मार्गी लागेल असे सांगून लाडकी बहिण योजनेबाबत पठारे यांना छेडले असता त्यांनी या योजनेचा देखील समाचार घेऊन ही योजना सध्याच्या सरकारने जरी अंमलात आणली असली तरी पण जनतेची दिशाभूल देणारी असून सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच जीएसटीचे डोक्यावर वाढून ठेवल्यामुळे या संकटातून जनतेला बाहेर पडणे कठीण झाले आहे.त्यामुळे या योजनेचा बहिणींना कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपयांची योजना सुरू करण्याचा दावा केला आहे.याबरोबरच मतदार संघात चढ_उताराचा परिसर असल्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे कमीत कमी दोन ते अडीच तास पाणी सोडण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे पठारे यांनी केली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात खराडी सारख्या माळरान व सध्या आयटी पार्क म्हणून समजल्या जाणाऱ्या भागात कंपन्या सुरू व्हावेत याकरिता केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन परिसरात खाजगी कंपन्यांचे जाळे पसरल्यामुळे आज राज्यातीलच नव्हे तर देशातील बेरोजगार महिला वर्गांना व तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले._
Post a Comment
0 Comments