या बाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
वाढत्या घरफोड्या, चोऱ्या, गुन्हेगारीमुळे ऐन निवडणुका व सणासुदीच्या काळात नागरिकांत दहशत पसरली आहे. सराईत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या या भागात सक्रिय असल्याने नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत . दरम्यान सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस एम निकम यांनी नागरिकांनी न घाबरता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक ११२ वर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते.त्याची दखल घेत पोलीसांनी सराईत तसेच भुरट्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी मोहिम राबविण्याचे लेखी आश्वासन आम आदमी पक्षाला दिले आहे.दरम्यान सिंहगड रोड धायरी भागात दिवस रात्र अशी २४ तास सशस्त्र पोलीसांची गस्त सुरू करण्यात येणार आहे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून सिंहगड रोड धायरी परिसरात घरफोड्या,जबरी चोऱ्या , महिलांची छेडछाड, दुकानदारांना दमदाटी असे प्रकार वाढले.गावातील गल्लोगल्ली , सोसायट्यांच्या पार्कीगमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचे टोळके उभे राहून महिला मुली यांची टिंगल टवाळी करत आहेत.त्यामुळे महिलांना दिवसाही घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.मोठ्या रक्कमेच्या जबरी चोऱ्या होऊनही गुन्हेगारांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार दाखल करत नाहीत. पोलीसांचा वचक नसल्याने लाखो नागरिकांचे जीव ऐन दिवाळीच्या सणासुदीत टांगणीला लागले आहेत.दरम्यान आम आदमी पक्षाच्या तक्रारीची दखल घेत शहर पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली सिंहगड रोड पोलिसांनी धायरी नऱ्हे, सिंहगड रोड परिसरात पेट्रोलींग सुरू केली आहे. तसेच या भागातील रेकॉर्डवरिल सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. महिला, नागरिकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांची तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस एम निकम यांनी केले आहे.या भागातील वाढती गुन्हेगारीला कायमचा पायबंद बसावा यासाठी नुकतेच सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी येथे नवीन पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांनी ११२ या हेल्पलाईन नंबरवर संर्पक करावा जणेकरुन सदर ठिकाणी पोलीसांना तात्काळ पोहचता येईल, तसेच वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचे प्रमाण यांचा विचार करुन शासनाने नुकतेच नांदेड सिटी पोलीस स्टेशनची निर्मीती केली आहे. त्यामुळे सदर भागातील गुन्हेगारी कमी होवुन गुन्हेगारावर पोलीसांचा वचक राहिल असे.
शहर पोलिसांनी धनंजय बेनकर यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे
Post a Comment
0 Comments