Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

वडगावशेरीत राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादीतच लढतीची शक्यता,आजी_माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला,तिसरा भिडू शडडू ठोकणार का?,मतदार संघात लढत होणार चुरशीची,विजयाचा गुलाल उधळणार कोण?

पुणे:- सोमनाथ साळुंके
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच जरी खरी लढत होणार असली तरी पण मतदार संघात तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरून शडडू ठोकणार का?याकडे राजकीय नेतेच नव्हे तर मतदारांचे लक्ष वेधून घेतल्याने मतदार संघात अतिशय चुरशीचा सामना होणार हे निश्चित मानले जात आहे.
नव्या फेरारचनेनुसार २००९साली हा मतदार संघ जाहीर झाला असला तरी पाम या मतदार संघात एकदा निवडून गेलेले उमेदवार पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येत नसल्याचा इतिहास गेल्या पंधरा वर्षांचा असला तरी पण मतदार संघात समाविष्ट असलेल्या खराडी,वडगावशेरी,धानोरी,लोहगाव या उपनगर भागासह ग्रामीण भागातील मांजरी, निरगुडी व वडगाव शिंदे भागाचा समावेश करण्यात आला आहे.तत्पूर्वी मतदार संघातील नागरिकांना मुख्य समस्या भेडसावत होती ती पाणीटंचाईची या भागातील नागरिकांना रात्री अपरात्री येणाऱ्या पाण्यामुळे रात्र जागून काढण्याची वेळ येत असतानाच जयप्रकाशनगर व साईनाथनगर भागात टँकरने पाणी मिळविताना दोन युवकांना जीव गंम विण्याची वेळ आल्याने याची खंत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मनाला लागताच याविरोधात त्यांनी आवाज उठवून मतदार संघात हांडे मोर्चे व  आंदोलने चेडल्यामुळे प्रशासनाचे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतल्याने झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येऊन या भागाला लष्कर व बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून सुटकेचा श्वास सोडला.तर मतदार संघात महिलांसह तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सतावत असताना पठारे यांनी ही समस्या सोडविण्यासाठी कंबर कसून खराडीसारख्या माळरान भागावर आज आयटी पार्कचे जाळे पसरविण्यात मोलाचा वाटा उचलल्यामुळे खराडीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचून अनेक महिला व तरुणांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागला असतानाच गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा व ते शिक्षणापासून वंचित राहू नये.याकरिता त्यांच्या शिक्षण संस्था कार्यरत असल्याने अनेक गरीब कुटुंबातील मुले शिक्षणाचा लाभ घेत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेत२००९साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)गटातून उमेदवारी आणण्यासाठी त्यांचे थोरले बंधू कृषी समितीचे माजी सभापती पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांच्या आशीर्वादामुळे पठारे यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मतदार संघावर पठारे यांच्या रूपाने पक्षाचा झेंडा फडकविन्यास यश आले होते.त्यांनी आत्ता भाजपला जय महाराष्ट्र करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस(sp)पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून त्यांनी मतदार संघात केलेल्या कार्यामुळे ते विजयाचे दावेदार मानले जात असून आज देखील त्यांच्या कार्यालयात जनता दरबार भरवून नागरिकांचे मुख्य प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे मतदार संघात पठारे यांचे नाव चर्चेत असल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू व राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक मानले जाणारे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा देखील राजकारणाचा इतिहास वाखण्याजोगा आहे.२०१२साली झालेल्या पालिका निवडणुकीत टिंगरे यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा हातात घेऊन निवडणूक लढविली होती.त्यावेळेस त्यांना थोड्या मताच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.त्यामुळे या पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांनी उडी घेऊन ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.त्यावेळेस देखील मतदार संघावर ते दुसऱ्या क्रमांकावर जाऊन त्यांची मतदार संघात असणारी ताकद मतदार संघात दिसून आली होती.तेव्हा त्यांनी पराभवाची मनात खंत न बाळगता मतदार संघातील तळागाळातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे असणारे मुख्य प्रश्न सोडविण्यावर भर दिल्यामुळेच की काय?जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत विधानसभेवर जाण्याची जी संधी दिली त्यांनी देखील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघात पावसाळ्यात होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत आवाज उठवून विधानसभेत आवाज उठविला होता.नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा निधी आणून त्यांनी विकासकामांचा धडाकाच मतदार संघात सुरू केला आहे.विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने ही त्यांच्या कामाची पावतीच म्हणावे लागेल.तर मागील निवडणुकीत भाजपची लाट असताना देखील शहरातील इतर मतदार सघापैकी हडपसर पाठोपाठ वडगाव शेरीत पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळताच टिंगरे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविन्यास यश आल्यामुळे त्यांचे देखील पारडे जड असल्याने व त्यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
      यापाठोपाठ भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांना देखील कमी लेखून चालणार नाही.कारण मतदार संघात पक्षाची कोणत्याही प्रकारची लाट नसताना देखील मुळीक यांनी पक्षाचे या संघात रोप लावून त्याचे रुपांतर वटवृक्षात करून तरुण कार्यकर्त्यांचा फौजफाटा वाढून पक्षाची ताकद वाढवली आहे.त्यांनी देखील तळागाळात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे महत्व पटवून देण्यात यश मिळविले असतानाच त्यांचे धाकटे बंधू व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी राजकारणाला महत्व न देता समाजकारणाला प्राधान्य देऊन वडगावशेरी भागात जी विकासकामे केली.त्याचेच फळ म्हणून २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदार संघावर पक्षाचा झेंडा फडकवला होता.त्यामुळे ते देखील उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते.मात्र महायुतीत समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाला हा मतदार संघ सोडण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.अगोदरच लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हा मतदार संघ सोडण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीत अधिक भर पडून मध्यंतरी झालेल्या पक्षाच्या जाहीर बैठकीत जर मतदार संघ मित्रपक्षाला सोडण्यात आल्यास आम्ही मित्रक्षाचे काम करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीरपणे आमदार पंकजा मुंडे यांना सांगण्यात आले सांगून असलेली नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे मुळीक हे अपक्ष निवडणूक लढविणार का?याबाबत मतदार संघात चर्चा रंगली असतानाच मतदार संघात मुळीक यांना मानणारा वर्ग आहे.ही त्यांच्या जमेची बाजू असून धानोरी प्रभागातून माजी नगरसेवक अनिल (बॉबी)टिंगरे यांचा देखील त्यांना हातभार लाभणार आहे.ते जर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांची नाराजी दूर करण्यास कितपत यश येणार हे देखील मुळीक यांच्यावर अवलंबून असून त्यांनी निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्यामुळे मतदार संघात मुळीक यांच्या रूपाने तिरंगी सामना रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वंचित, मनसे,एमआयएम,बसपा या छोट्या पक्षाच्या उमेदवारावर देखील इतर उमेदवारांचे भविष्य अवलंबून आहे.यामुळे मतदार संघात जरी राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारमध्ये लढत होण्याचे चित्र दिसून येत असले तरी पण तिसऱ्या अपक्ष उमेदवाराने शडडू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यास या मतदार संघात प्रत्येक उमेदवारास तारेवरची कसरत करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.त्यामुळे मतदार संघावर कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे सांगणे कठीण असून याचा होणारा निर्णय निकालाच्या वेळेसच कळेल.हे मात्र निश्चित

Post a Comment

0 Comments