Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

महाविकास आघाडीचा शिलेदार कोण?,काँग्रेसमधून राज निकमांचे नाव आघाडीवर,रणसंग्राम शिवाजीनगर मतदार संघाचा

 पुणे:- प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे आशीर्वाद घेताना राज निकम,
 नेत्यांचे लक्ष वेधून राहिलेल्या शिवाजीनगर मतदार संघात महाविकास आघाडी पक्षाकडून कोणता शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली असली तरी पण मतदार संघातून काँग्रेसचे राज निकम यांचे नाव आघाडीवर असून निकमांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड थोपटले आहे.
         या मतदारसंघात प्रामुख्याने दलित,ख्रिश्चन,मुस्लिम,मागासवर्गीय समाजाचे मतदार जरी मोठ्या प्रमाणात असले तरी पण मतदार संघात मराठा समाज मतदारांना विसरून चालणार नाही.या ठिकाणी मराठा समाजाचे देखील मतदान निर्णायक ठरणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.हा मतदार यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जात होता.मात्र गेली दहा वर्षे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी पण या कालावधीत मतदार संघाचा असलेला विकास हा कागदोपत्री राहिल्याने मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे.त्यामुळे मतदार संघात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने देण्यासाठी रणनीती आखली आहे.त्यामुळे मागील आठवड्यात काँग्रेस भवन येथे शहरातील इतर मतदार संघासह या मतदार संघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
       येथून जवळपास बारा उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असली
तरी पण मतदारांना या ठिकाणी पक्षाने नव्या उमेदवारास संधी देण्याच्या मागणीला जोर धरू लागला असतानाच सध्या काँग्रेस पक्षातून सुशिक्षित असलेले व मतदारांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणारे व नवा चेहरा म्हणून पाहिले जाणारे राज निकम यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.कारण भाजपची लाट असताना अनेकांनी पक्षाची साथ सोडत भाजप पक्षाचा हात पकडला होता.पण निकम यांनी संकटाच्या काळात देखील पक्षाची साथ न सोडता पक्ष वाढीसाठी कंबर कसली असतानाच मध्यंतरीच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे.याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले असताना निकम यांनी आरक्षण मिळावे याकरिता आंदोलनाच्या रिंगणात उडी घेतल्याने त्यांच्या या कामगिरीमुळे मतदार वर्ग देखील प्रभावित होऊन आज निकम यांच्या पाठीशी युवकांचा फौजफाटा दिसून येत असतानाच ज्येष्ठांचा आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी लाभत आहे.
        याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार )गटाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची देखील निकम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे निकम यांची असणारी बाजू वरचढ दिसून येत असून पवार साहेब यांच्याशी निकम यांची तब्बल एक ते दिड तास चर्चा झाल्याने त्यांची जमेची बाजू दिसून येत आहे.विशेष म्हणजे त्यांनी राजकारणाला आजपर्यंत महत्व न देता समाजकरणातून सत्ता नसताना देखील जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिल्यामुळे आज मतदारांचा देखील त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवत आहे.तर सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्यामुळे जनतेचे असलेले प्रश्न सोडविण्यावर प्राधान्य मिळेल.अशी आशा नागरिकांना वाटत आहे.
    शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट हा एसी तर कसबा मतदार संघ हा प्रामुख्याने ओबीसी समाजातील उमेदवाराचे आरक्षण असल्याने या मतदार संघात मराठा पॅटर्न राबविणे गरजेचे असून राज निकम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर ते विजयाचे निश्चित दावेदार मानले जात आहे.कारण त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आलेख सर्व काही सांगून जात असताना ते सुशिक्षीत असल्याने ही त्यांची जमेची बाजू असून आता मतदारांना देखील नवीन चेहरा असणे गरजेचे वाटू लागत असल्याने निकम यांना उमेदवारी मिळाल्यास आत्ताच विरोधकांनी त्यांच्या नावाचा धसका घेतला असतानाच उमेदवारीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्या शिवाय राहणार नाही.याबरोबरच मुलाखत देण्यासाठी आलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी निकम यांना पाठिंबा दर्शविला आहे.त्यामुळे मतदार संघात राज निकम यांनाच उमेदवारी मिळावी याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदार संघात रंगली असल्यामुळे ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.निकम यांना उमेदवारी मिळावी या मागणीला मतदार संघात जोर धरू लागली असून त्यांना जर उमेदवारी मिळालीच तर कॉग्रेसचा असलेला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यास माहाविकास आघाडी पक्षाला निश्चितपणे यश मिळणार हे मानले जात आहे. २)मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनात सहभागी झालेले राज निकम,३)काँग्रेसचे उमेदवारीचे प्रबळ दावेदार राज निकम..

Post a Comment

0 Comments