संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष जगन्नाथ माने(पाटील)
पुणे_सोमनाथ साळुंके
वडगावशेरी विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राचे बलस्थान असलेल्या सामर्थ्य जनशक्ती संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार असून मतदार संघात पुन्हा संघटनेची ताकद संघटना प्रमुख अजमावणार?याकडे संपूर्ण कार्यकर्त्यासह मतदारांचे लक्ष वेधून राहिले आहे.
सध्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असल्यामुळे विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांची उमेदवारी मिळावी या उद्देशाने दिल्लीसह मुंबई वारी सुरू असल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते वडगावशेरी विधानसभा मतदार संघाने या ठिकाणी आजी_माजी आमदारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दंड थोपटले असताना खरे लक्ष केंद्रीत केले आहे.ते सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष जगन्नाथ माने(पाटील)यांनी त्यांचा यापूर्वीचा इतिहास पाहिला तर लष्करात देशाची सेवा करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवेसाठी झोकून दिल्याचा इतिहास आहे. माने हे लष्करातून निवृत्त झाल्यावर ते आपल्या कुटुंबाबरोबर राहत असताना त्यांच्या एक गोष्ट निदर्शनात आली ती म्हणजे सध्या तरुण व महिला वर्गात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून ते नोकरीच्या शोधार्थ अनेक कंपन्यांची दारे ठोठावत आहेत.पण युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याने युवा पिढी ही वाम मार्गाला जाऊन व्यसनाधीन झाल्याचे दिसून आल्यावर त्यांच्या मनाला ही गोष्ट कुठे तरी टोचत होती.त्यामुळे त्यांचे मन देखील त्यांना शांत बसू देत नव्हते
पुण्यात स्थायिक झालेले माने(पाटील)यांनी युवकांना व्यसनातून मुक्त करण्याचा विडाच हाती उचलून त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर सर्वात प्रथम कुठे तरी नोकरी करण्यापेक्षा युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी या गोष्टीला प्राधान्य देऊन सर्वात प्रथम धानोरी सारख्या भागात सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे रोप लावून व्यसनाधीन झालेल्या युवकापर्यंत पोहचवून त्यांना दारूचे होणारे दुष्परिणाम याबाबत पटवून देऊन तरुणांमध्ये जनजागृतीचे काम हाती घेऊन अशा तरुणांना संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय अथवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज अनेक तरुणांना व महिलांना संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे संघटनेचे रुपांतर सध्या वटवृक्षात होऊन राज्यातील रायगड,नवी मुंबई,मुंबई,पुणे शहर,अहमदनगर,सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर आदी जिल्ह्यांनी संघटनेची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळेच की,काय?त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविण्याचे काम हाती घेऊन आंतरराष्ट्रीय खेळाडू व विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेले त्यांचे सुपुत्र डॉ.स्वप्नील जगन्नाथ माने(पाटील) यांनी देखील संघटनेची ताकद वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असून त्यांच्या कष्टाला देखील फळ आले आहे.आज संघटनेची ताकद वाढविण्यासाठी मतदार संघातील अनेक युवक व महिला वर्ग हे डॉ.स्वप्नील माने यांच्या पाठीशी उभे राहून खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.माने यांना अनेक पक्षाकडून पक्षात येण्याच्या ऑफर येऊन देखील त्यांनी आलेल्या ऑफर धुडकावून संघटनेच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आहे.त्यामुळे युवकांची देखील मोठी फौज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.तर रोजगार मिळाल्यामुळे अनेक महिलांचे संसार संघटनेच्या माध्यमातून उभे राहिल्यामुळे विविध महिला संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत.
त्यातच राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असतानाच वडगावशेरी मतदार संघात सातारा,सांगली,कोल्हापूरसह कोकण भागातील मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांना मानणारा वर्ग आहे.या भागात ५०हजाराहून अधिक पश्चिम महाराष्ट्रातील मतदार वर्ग असल्यामुळे त्यांना हा मानणारा वर्ग आहे.त्यामुळे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे मतदान निर्णायक ठरणार असल्यामुळे माने(पाटील)यांना मानणाऱ्या वर्गाने माने यांना निवडणुकीत उभे राहण्याचा हट्टच धरल्याने त्यांची बाजू अधिक बळकट झाल्याने माने यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दंड थोपटले असले तरी पण त्यांनी आत्तापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहायचे की,कोणत्या तरी एखाद्या उमेदवारास पाठिंबा द्यायचा ही महत्वाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.तो जो निर्णय घेतील तो निर्णायक ठरणार असून वडगाव शेरी,खराडी,लोहगाव,वडगाव शिंदे,धानोरी,विश्रांतवाडी,येरवडा आदी भागात त्यांना मानणारा वर्ग असून या भागातील मतदारांचा कल त्यांच्याच बाजूने दिसून येत असल्यामुळे विरोधकांना देखील त्यांच्या ताकदीचा अंदाज आल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मतदार संघातील सर्व असणारे राजकारणाची गणिते बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे सध्या तरी दिसून येत असून विधानसभा निवडणुकीत स्वतः जगन्नाथ माने(पाटील)अथवा त्यांचे सुपुत्र डॉ.स्वप्नील माने(पाटील)हे उतरणार हे निश्चित झाले नसले तरी पण त्यांनी देश सेवेसह बेरोजगार तरुण व महिलांसाठी हाती घेतलेले कार्य हे त्यांच्या मदतीला धावून येणार असून संघटनेचे कार्य पाहून शहरातील विविध पदावर काम करणारे वकील,पत्रकार व पोलीस मित्रांनी देखील त्यांच्या संघटनेत उडी घेऊन विविध पदावर कार्यभार सांभाळत असल्याचे ही त्यांची जमेची बाजू आहे.त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सामर्थ्य जनशक्ती संघटनेची भूमिका माने यांच्या रूपाने निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात असून त्यांच्या माध्यमातून मतदार संघातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी मांडलेली समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते संघटनेच्या माध्यमातून शहरासह सासवड,खडकवासला,शिवाजीनगर या मतदार संघासह नाशिक,रायगड,नवी मुंबई,सांगली आदी जिल्ह्यात संघटनेचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष जगन्नाथ माने(पाटील)यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments