Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

शिवाजीनगरमध्ये काँग्रेसकडून रिंगणात कोण?,राज निकमांचे पारडे जड,निकम जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार


पुणे : प्रतिनिधी
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची उत्सुकता मतदारांची शिगेला पोहचली असली तरी पण मतदार संघात राज निकम यांचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे 
        मतदार संघात मध्यम वर्गीयासह झोपडपट्टी भागाचा प्रामुख्याने समावेश होत असून प्रामुख्याने हा वर्ग काँग्रेस पक्षाला मानणारा आहे.त्यामुळे मतदार संघात काँग्रेस पक्षाची बाजू बळकट असल्याचे दिसून येत आहे.मतदार संघावर मागील दहा वर्षाच्या कालावधीत विरोधकांची जरी सत्ता असली तरी मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी ते खोळंबली असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यात प्रामुख्याने झोपडपट्टीचा प्रश्न असो की,वाहतूक कोंडीचा तो आजपर्यंत सुटलेला नसून तरुण युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असतानाच वडारवाडीत बांधलेली भाजी मंडई आज सुधारणेअभावी धूळखात पडून असल्याने भाजी विक्रेत्यांना आज देखील रस्त्यावरच भाजी विक्री करण्यासाठी बसण्याची वेळ येत आहे.
          याबरोबरच दोन दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने इतर मतदार संघासह या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.तेव्हा येथून जवळपास बारा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजेरी लावून मुलाखती दिल्याने मतदार संघात हा चर्चेचा विषय बनला आहे.कारण येथून दत्ता बहिरट यांच्यासह मनीष आनंद व त्यांच्या पत्नी पूजा आनंद यांनी जरी मुलाखत दिली असली तरी पण या मतदार संघातून पक्षश्रेष्ठीसह लक्ष वेधून घेतले ते गोरगरिबांचे कैवारी म्हणून पाहिले जाणारे ते राज निकम यांनी कारण ज्यावेळेस देशातच नव्हे तर शहरात देखील विविध मतदार संघासह शिवाजीनगर भागातून ही विरोधी उमेदवाराने मतदार संघावर यश मिळविले असताना देखील अनेकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात प्रवेश करण्यास प्राधान्य दिले होते.मात्र राज निकम यांनी पक्षाशी एकनिष्ठपणा दाखवत मतदार संघातील नागरिकांचे मुख्य प्रश्न सोडवण्यास निकम यांनी प्राधान्य देऊन सत्ता नसताना देखील मतदार संघातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यास प्राधान्य देऊन समाजातील गोरगरीब महिलांना नोकरीसाठी कंपन्यांची दारे ठोठावण्या  पेक्षा रोजगार मिळावा या उद्देशाने बचत गटाची स्थापना करण्यास हातभार लावल्याने आज मतदार संघातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन घरातील कुटुंबांना हातभार लागल्याने मतदार संघातील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
        याचबरोबर महीलापाठोपाठ बेरोजगार तरुणांना देखील नोकरीच्या माध्यमातून मदत केल्याने सध्याच्या परिस्थितीत तरुण वर्ग हे राज निकम यांच्याकडे आधारस्तंभ म्हणून पाहत आहेत.त्यामुळे गेल्या दहा वर्षाच्या काळात अनेक बेरोजगार महिलासह तरुणासाठी केलेले कार्य हे तरुणांना प्रेरणा देणारी असल्यामुळे युवकांचा असलेला फौजफाटा हा त्यांच्याकडे वळला असल्याचे दिसून येत आहे.यामुळे त्यांचे पारडे जड असतानाच त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला मनमिळावूपणा याबरोबरच गणेशोत्सव व नवरात्रीच्या काळात अनेक मंडळांच्या वतीने त्यांचे जल्लोषात करण्यात आलेले स्वागत हे निकम यांची कामाची पावती असून ते सर्व काही सांगून जात आहे.
     विशेष म्हणजे मागील आठवड्यात पक्ष कार्यालयात अनेक इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीत अनेक उमेदवारांनी निकम यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे हे सर्व काही सांगून जात असून मतदार संघात सत्ता नसताना देखील त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे.त्यातच युवकांचे नेते म्हणून पाहिले जात असतानाच आजपर्यंत अनेक गोरगरीबांच्या मदतीला ते हक्काने धावून गेले असल्यामुळे वयोवृध्द नागरिकांचा आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांची असणारी ताकद अधिक बळकट झाली आहे.त्यातच शनिवारी मतदार संघात रॅली काढून केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांना मिळालेला प्रतिसाद ही त्यांची जमेची बाजू असून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पावती काढलेल्या रॅलीत व जनतेने दिलेला प्रतिसाद सर्व काही सांगून जात असून यामुळे विरोधकांची देखील अवस्था त्यांना जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे बिकट झाली आहे.याबरोबरच पक्षश्रेष्ठींचा देखील त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विकासकामामुळे सार्थ विश्वास ठरण्यास यशस्वी होणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून राज निकम हेच प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडणार असा विश्वास कार्यकर्त्यांना च नाही तर मतदारांचे देखील लक्ष वेधले आहे._

Post a Comment

0 Comments