Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

मिरवणुकीत युवकावर प्राणघातक हल्ला,कळसमधील घटनेने परिसर हादरला,पोलीस तैनातमुळे छावणीचे स्वरूप

पुणे_सोमनाथ साळुंके
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निघालेल्या देवीच्या मिरवणुकीमध्ये युवकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात युवक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरचा प्रकार कळस येथील जाधव वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास घडला.
       संबंधित घटनेत जखमी युवकाचे व आरोपीचे नाव समजले नसून आरोपी ह्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार कोजागिरी पौर्णिमे निमित्त कळस भागातील जाधववस्ती परिसरात जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने देवीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक सुरू असताना काही कारणावरून जखमी युवक व आरोपी यांच्यात वाद सुरू असताना आरोपीने युवकाच्या डोक्यात शस्त्राने वाट केल्याने या घटनेत युवक जखमी होऊन त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त असताना देखील अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची घटना घडल्याने या भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.घटनेची तात्काळ माहिती विश्रांतवाडी पोलिसांना समजताच यावेळी तात्काळ पोलीस बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी सुरू असलेली मिरवणूक तात्काळ बंद करण्यास पोलिसांना यश आले.
    एक ते दिड महिन्यात दुसरी गंभीर स्वरूपाची घटना परिसरात घडल्यामुळे या भागात एकच खळबळ उडून महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दिड महिन्यापूर्वी प्रियशीने दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यामुळे याचा राग मनात धरून प्रियकराने याचा राग मनात प्रियशीचा धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून केल्याच्या घटनेला दिड होत नाही तोच दुसरी घटना घडल्याने येथील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर येऊन कायदा सुव्यवस्थेचा विषय गंभीर बनला आहे.घडलेल्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन युवकाच्या डोक्यात केलेल्या गंभीर स्वरूपाचा प्रहार हा आरोपीच्या हातातील कड्याने करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे.यावेळी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून कडक पोलीस बंदोबस्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments