पुणे_सोमनाथ साळुंके
राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून राहिलेल्या शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेसचे युवापर्व म्हणून पाहिले जाणारे व उमेदवारीचे दावेदार असलेले राज निकम यांनी मतदार संघातून भव्य रॅली काढून केलेल्या शक्ती प्रदर्शनात मतदारांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद लाभल्याने केलेल्या शक्तीप्रदर्शनात त्यांनी मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला अवघा एक ते दिड महिना राहिला असल्याने इच्छुक उमेदवारांची असलेली लगबग ही मोठ्या प्रमाणात दिसून येत असली तरी सुध्दा संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्यातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून राहिलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात सध्या महायुतीची जरी सत्ता असली तरी यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या मतदार संघात विरोधकांना धूळ चारण्यासाठी महआविकास आघाडीकडून देखील चाचपणी सुरू असताना हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसकडेच जाणार हा उद्देश ठेवून दोनच दिवसापूर्वी काँग्रेस भवन येथे शहरातील आठ मतदार संघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर मतदार संघातून तब्बल बारा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असताना यामध्ये प्रामुख्याने चर्चेत आले ते युवापर्व म्हणून पाहिले जाणारे राज निकम यांना मतदार संघात मतदारांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिसून आला आहे.मुलाखत सुरू होण्यापूर्वी राज निकम यांनी येरवडासह,संगमवाडी,शिवाजीनगर,वडार वाडी,जनवाडी आदी भागातून रॅलीला सुरुवात केली.तेव्हा या मतदार संघात काढलेल्या रॅलीमुळे त्यांनी कार्यकर्त्यासह मतदारांची शिवाजीनगर भागात मने जिंकून घेतली.त्यामुळे काढलेल्या रॅलीत मतदारांचा असलेला कौल हा निकम यांच्या बाजूने असल्याचे नागरिकांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते.अनेक भागात त्यांना महिलांनी ओवाळणी करताना कार्यकर्त्यांनी राज निकम बढो हम तुम्हारे साथ है,काँग्रेस पक्ष झिंदाबाद या दिलेल्या नाऱ्यामुळे परिसर देखील दुमदुमून निघाला होता.तर गाड्यांचा ताफा पाहून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकली होती.यावेळी वाहनांना लावलेल्या झेंड्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
निकम यांचे काँग्रेस भवन येथे आगमन होताच त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.तर काँग्रेस भवन येथील पक्ष कार्यालयात ज्यावेळेस राज निकम यांनी हजेरी लावताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.पक्षश्रेष्ठींनी जेव्हा त्यांना निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम गोखलेनगर,खैरेवाडी,जनवाडी, मुळारोड,पाटील इस्टेट,औंध परिसर,कस्तुरबा वसाहत,खडकी,तोफखाना आदी मतदार संघातील परिसर हा प्रामुख्याने झोपडपट्टी भाग म्हणून पाहिलं जात असून सर्वात प्रथम माझे धोरण हे आहे की,असलेला परिसर झोपडपट्टी मुक्त करून माझ्या सर्वसामान्य जनतेला पक्की घरे बांधून देण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे उत्तर देताच कार्यालयात टाळ्यांचा गडगडाट करण्यात येऊन अनेक जण त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे भारावून गेले.याचबरोबर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करून आज अनेक कुटुंबातील महिला व तरुणवर्ग यांना नेहमीच बेरोजगारीचा प्रश्न सतावत असून अशा महिला व तरुणांना रोजगाराच्या अथवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताच पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान व्यक्त केले आहे. महिला कार्यकर्त्यांशी बातचीत करताना राज निकम,
तर मुलाखती वेळेस अनेक इच्छुक उमेदवारांनी राज निकम यांना पाठिंबा दर्शविल्याने ही त्यांची जमेची बाजू असल्याचे स्पष्ट होऊन या मतदार संघातून आगामी होणाऱ्या विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असल्याची चर्चा मतदार संघात रंगली असून या मतदार संघातून उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली तर गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदार संघातच नव्हे तर शहरात देखील पक्ष वाढविण्यासाठी हाती घेतलेले कार्य ही त्यांच्या कामाचीचं पावती त्यांना मिळाल्याचे समाधान कार्यकर्त्यांसह येथील मतदारांना मिळेल.अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे.___
Post a Comment
0 Comments