Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

रात्रीचे वेळी पायी चालणारे इसमाचा मोबाईल हिसकाऊन घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलीसांकडून अटक,

            विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाची कामगीरी.
न्यु स्टार न्युज इंडिया :-रात्रीचे वेळी पायी चालणारे इसमाचा मोबाईल हिसकाऊन घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलीसांकडून अटक, आरोपीकडून चोरुन नेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त.
दि. १०/०९/२०२४ रोजी तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार असे पोलीस स्टेशनचे हददीत गणेशोत्सवाचे अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस हवालदार अमजद शेख व संजय बादरे यांना त्यांचे बातमीदारांडून बातमी मिळाली की, धानोरी रोडवरील खदानीचे जवळ पल्सर मोटार सायकलवर दोन इसम संशयीतरित्या थांबले आहेत अशी खात्रीशीर बादमी मिळाल्याने बातमी प्रमाणे खात्री करण्यासाठी वरील सर्व अंमलदार गेले असता दोन इसम पोलीसांना पाहून त्यांचेकडील पल्सर गाडीवरुन पळून जावू लागल्याने व सदर मोटार सायकलला पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नसल्याने पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) अर्जुन नामदेव राठोड, वय १९ वर्षे, रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव पुणे मुळ गाव मु पो कांगडगी तांडा, पोस्ट आलू, ता. जेऊरगी, ता गुलबर्गा, राज्य कर्नाटक २) विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगीतले. सदर इसमांकडे चौकशी करुन आरोपी अर्जुन राठोड याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे डावे खिशात एक काळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मिळून आल्याने व त्यामध्ये सिमकार्ड नसल्याने त्यास त्या मोबाईल बाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मोबाईला हा दि. ०७/०९/२०२४ रोजी रात्रौ ०२.०० वा चे सुमारास धनेश्वर शाळा, मुंजाबावस्ती येथे एक इसम रस्त्याने मोबाईलवर बोलत चालला असताना पाठीमागून मोटार सायकलवरून येवून त्या इसमाचे हातातील मोबाईल हिसकावून घेवून गेलो होतो व तो मोबाईल विकण्यासाठी आम्ही आज विश्रांतवाडी चौक या ठिकाणी आलो होतो परंतू तेथे पोलीस दिसल्याने आम्ही परत लोहगाव येथे चाललो होतो असे सांगीतल्याने आरोपी अर्जुन नामदेव राठोड यास गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटार सायकल असा एकुण १,१२,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments