पुणे प्रतिनिधी:- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दि.२५/०८/२०२४ रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीत पदमराज गंपले पोलीस उप निरीक्षक हे रात्रपाळी अधिकारी म्हणुन तसेच धानोरी मार्शल वरील पोलीस अंमलदार पोशि काची व काकडे असे धानोरी हद्दीत पेट्रोलिग करीत असताना गुप्त माहीती मिळाली की, दोन इसम हे माधव नगर, अदित्य हॉटेल शेजारी, टपरी फोडुन चोरी करत आहेत..... अशि खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी धानोरी मार्शल वरील अंमलदार व रात्र गस्त अधिकारी पोउपनि पदमराज गंपले असे घटनास्थळी गेले असता तीन संशयीत इसम त्याच्या ताब्यात असलेल्या स्कुटी वरुन पळुन जात असताना दिसल्याने त्याचा पाठलाग करुन गुन्हेगार आरोपी ईसंम नामे -
१) रोहीत रामदास मस्के व.व. २४ धंदा. खाजगी नौकरी रा. शरद लॉन्स जवळ, महादेव नगर लेन नं०२. धानोरी पुणे,
२) मयुरेश सिध्देश्वर भिसे व.व. २१ रा. फाळके चौक, कलवड वस्ती लोहगाव पुणे, ३) तेजस वसंत खरात व.व. २२ रा.सर्व नं २४६ पानसरे वस्ती, कलवड, लोहगाव पुणे,
अश्या तीघांना ताब्यात घेवुन विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे... आणून त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी माधव नगर परिसरात घरफोडी केल्याचे सांगून कबूल केल्याने त्यांचे ताब्यातून अगझडती रोख रक्कम व साहित्य असा एकुण किंमती ४५,०७६/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.... त्यामध्ये रोख रक्कम १८२०/- रु. पानटपरी मधील साहीत्य ८२५६/- व आरोपीत यांनी गुन्हा करते वेळी वापरलेले दुचाकी वाहण रक्कम ३५,०००/- असे गुन्ह्यांत हस्तगत,
करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक पदमराज गंपले विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कामगिरी मनोज पाटील सो अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. श्री हिम्मत जाधव सो पोलीस उप आयुक्त परी ०४ पुणे शहर, मा. श्रीमती. अनुजा देशमाने सो मा. सहा पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर, श्रीमती कांचण जाधत पो विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. शंकर साळुखे सो (गुन्हे) विश्रांतवाडी पो शहर, श्री. पदमराज गंपले पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार काची, काकर कलांडीकर, माळी, मोरे सर्व नेमणुक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी व पुणे
Post a Comment
0 Comments