संपूर्ण शहर सकाळी सकाळी साखरझोपेत असताना रात्रीच उरलेलं अन्न ,शीळ किंवा खराब झालेले पदार्थ , ओला कचरा सुका कचरा अगदी दारात येऊन त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम पुणे महानगरपालिका चोखपणे करतेय .
त्याचा अविभाज्य भाग म्हणजे दुर्लक्षित घटकात मोडणारे घंटा गाडी किंवा कचरा गाडीचे 31 ड्रायव्हर्स यांचा आमच्या RTO PUNE अ दर्जा मानांकित मुळीक मोटार ड्रायविंग स्कुल तर्फे सन्मान देशाचा सन्मान वाहकांचा उद्देश समोर ठेवून मोमेन्टो आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला आहे.
विशेष सन्मान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यातर्फे नेहा कांबळे (सहायक मोटर वाहन निरीक्षक) यांच्या मार्गदशनाखाली आणि विलास नाईकनवरे (कारगिल निवृत्त कर्नल , योद्धा करिअर ऍकेडमी संस्थापक ) यांच्या उपस्थित 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केला गेला . सामाजिक कार्यकर्ते अमित म्हस्के , सचिन भोसले आणि गणेश विटकर यांचे विशेष सहकार्य लाभले उर्वरित शहरातूनही असा उपक्रम राबवावा जेणेकरून घंटा गाडी ड्रायव्हर्स , कचरा व्यवस्थापन आणि नियोजन यासाठी जनजागृती होईल हा आमचा प्रामाणिक विश्वास स्नेहल मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला
Post a Comment
0 Comments