Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

प्रशासन अधिकाऱ्याची तक्रारदारास अरेरावीची भाषा,मिठाईत अढळला मृत मच्छर,तारीख उलटून ही थंडपेयाची विक्री,अधिकारी महिलाचीच प्रतिनिधींना धमकी

                          थंडपेयाच्या असलेल्या बाटल्या,
       सोमनाथ साळुंके
थंडपेयाची तारीख उलटून देखील त्याची विक्री करणाऱ्या व मिठाईत मृत मच्छर आढळलेल्या दुकानदार विरोधात तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदारांना अन्न प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळून त्यांची अरेरावीची भाषा ऐकण्याची वेळ तक्रारदार यांच्यावर आल्याने अधिकाऱ्यांच्या कामकाजबाबत शंका उपस्थित होत आहे.

यासंदर्भात तक्रारदारांनी  न्यु स्टार न्यूज इंडिया बोलताना सांगितले की,सोमवार (दि.५)या तारखेला शुभम वाघमारे व मनोज हजारे हे दोघे मित्र संध्याकाळच्या सुमारास धानोरी येथील टिंगरेनगर परिसरात काही कामानिमित्त गेले असता या दोघांना तहान लागल्याने येथील नामांकित असलेले गणेश स्वीट दुकानात गेल्यावर त्यांनी पाण्याची बॉटल ऐवजी नामांकित कंपनीची थंडपेयाची बॉटल विकत घेतली असताना त्यावरील कंपनीची असलेली मर्यादित तारीख संपून देखील संबंधित व्यावसायिक हा या बॉटलची सर्रासपणे बेकायदेशीररित्या विक्री करून प्रशासनाची फसवणूक करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे निदर्शनास आल्यावर याबाबत मोरे व हजारे यांनी संबंधित दुकानदारयास यासंदर्भात विचारणा केल्यावर त्याने संबंधित ग्राहकांना शांतपणे उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्या या उत्तराने  कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी येथील असलेल्या मिठाईची शहानिशा केली असता त्यामध्ये मृत मच्छर पडल्याचे निदर्शनास आले.                 रसगुल्ल्यात मृत आढळलेला मच्छर,
त्यामुळे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फोन करून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर पोलीस देखील घटनास्थळी हजर राहून येथील दुकानात एक नव्हे तब्बल साठ थंड पेय बॉटल्सची मर्यादा संपल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकर्त्यांना याचा धक्काच बसला.यामुळे संबंधित व्यावसायिक प्रशासनाची किती प्रमाणात फसवणूक करत आहे.हे सांगणे कठीण झाले आहे.सोमवारी प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने या भागातील एका माजी नगरसेवि केच्या पतीस घटनेची माहिती दिल्यावर हे महाशयांनी देखील प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केला.यामुळे या घटनेची  गंभीर दखल घेऊन या दोन कार्यकर्त्या सह इतर देखील कार्यकर्ते त्यांच्यासमवेत मंगळवार(दि.६)रोजी पूर्व भागासाठी अन्न प्रशासन विभागाचे असलेले कार्यालय या ठिकाणी जाऊन वरिष्ठ पदावर असलेले उमाप (संपूर्ण नाव समजू शकलेले नाही)यांच्याशी यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कार्यकर्त्यांना सभ्यपणाची वागणूक देण्याऐवजी आलेल्या कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.त्यामुळे अधिकाऱ्याकडून मिळालेल्या उद्वाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यकर्त्यांना या उत्तराने धक्काच बसला असून अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे त्यांच्या कामावर शंका उपस्थित होऊन तक्रार द्यायची कोणाकडे?हा मुख्य प्रश्न उपस्थित होऊन अधिकारी हे व्यावसायिकास पाठीशी घालत असल्याचा आरोप संबंधित तक्रारदारांनी केला असून यासंदर्भात तक्रारदारांनी सिवीक मिररशी बोलताना सांगून अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे सांगितल्याने प्रतिनिधींकडे संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर नसल्याने अन्न प्रशासन विभागाच्या निरीक्षक अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रथम दुकानदार विरोधात कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्याने कारवाई करणार असल्याचे सांगितले असले तरी पण कार्यकर्त्यांना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याचे विचारताच त्यांनी देखील प्रतिनिधींशी उध्दटपणाची भाषा करून तुमची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकीच प्रतिनिधींना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून उमापं यांनी केलेल्या भाषेचे रेकॉर्डिंग देखील मोबाईलमध्ये झाले असल्याने कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा करणाऱ्या व प्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.__
संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यास गेल्यावर कोणी ही येऊन तक्रार करत असल्याचे बोलून आम्हाला अरेरावीची भाषा वापरली आहे._नागेश देडे_सामाजिक कार्यकर्ते__विश्रांतवाडी__
दोन दिवसापूर्वी तक्रार करण्यास अधिकाऱ्याकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला अपमांन स्पद वागणूक दिली.यामुळे अधिकारी हे व्यावसायिकास पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे.__प्रदीप रावते__सामाजिक कार्यकर्ते_धानोरी_

Post a Comment

0 Comments