Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

विधानसभेसाठी बॉबी टिंगरेंनी थोपटले दंड,विरोधकांना टिंगरे दाखविणार कात्रजचा घाट,

        पुणे_सोमनाथ साळुंके
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धानोरीचे कार्यसम्राट नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांनी दंड थोपटले असून होणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विरोधकांना कात्रजचा घाट दाखविणार असल्याची चर्चा मतदार राजामध्ये रंगू लागली आहे.
      सध्या आगामी विधानसभा निवडणूक काही महिन्यापूर्वी येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना यापूर्वी हवेली व बोपोडी या दोन विधानसभा मतदार संघात विभागून असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ हा २००९साली नव्या फेररचनेनुसार मतदार संघ उदययास येऊन या मतदार संघावर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस तर एक वेळेस भाजप पक्षाच्या उमेदवाराने मतदार संघावर पक्षाचा झेंडा फडकविण्यास यश मिळविले असल्याने या मतदार संघावर सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून राहिले असताना सध्या मतदार संघात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.ती धानोरी प्रभाग क्रमांक १चे ज्यांच्याकडे कार्यसम्राट नगरसेवक पाहिले जाते ते म्हणजे मतदारांच्या गळ्यातील ताईत बनलेले व ज्यांच्याकडे जनतेचे कैवारी म्हणून पाहिले जात आहे.ते अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्याकडे यापूर्वी प्रथमच पालिका निवडणुकीच्या रिंगणातून उतरणारे टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पालिका सभागृहात जाण्याची संधी दिल्याने त्यांनी देखील जनतेचा विश्वास सार्थ ठरवत प्रभागातील केलेल्या विकासकामे यामुळे त्यांनी पुन्हा मागे वळून न पाहता तीन वेळेस त्यांनी नगरसेवकपदाची हट्रिक केल्याने युवकांच्या गळ्यातील ते ताईत बनून गोरगरीब जनतेचे ते असलेले प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देत असल्याने गोरगरीब जनतेचे ते कैवारी बनले आहेत.विशेष म्हणजे सर्व जानकारांचे लक्ष वेधून राहिलेल्या या प्रभागात २०१२साली झालेल्या पालिका निवडणुकीत टिंगरे विरुध्द टिंगरे असा सामना रंगून त्यांनी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना कात्रजचा घाट दाखवत त्यांना चारीमुंड्या चीत करत विद्यमानांना पराभवाची धूळ चारल्याने त्यांची प्रभागात असलेली ताकद यामुळे दिसून येत आहे.सध्या ते जरी भाजप पक्षाचे असले तरी पण विधानसभा निवडणुकीत त्यांना जर माहाविकास आघाडीकडून उमेदवारीची ऑफर आली तर ते महाविकाड आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाकडून उमेदवारीच्या रिंगणात उभे राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांनी आपल्या गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणातील असलेला दांडगा अनुभव याबरोबरच राजकारणाला महत्व न देता त्यांनी समाजकारणाला महत्व देऊन प्रभागातील केलेल्या विकासकामे याच बरोबर कार्यकर्त्यासह त्यांच्या पाठीशी असलेले पाठबळ त्यांच्या कामाशी येणार असून यावेळेस जर पुन्हा प्रभागात विधानसभा निवडणुकीत बॉबी टिंगरे विरुध्द सुनील टिंगरे असा जर सामना मतदार संघात रंगला तर पुन्हा या मतदार संघात चुरशीचा सामना रंगण्याची चर्चा मतदार संघात असली तरी पण बॉबी टिंगरे यांचे पारडे वरचढ असल्याची चर्चा मतदारामध्ये रंगली आहे.याबरोबरच पंधरा वर्षाच्या प्रभागात केलेली विकासकाम ही त्यांच्या कामाची पावती जनतेपर्यंत पोहचविल्याने त्यांचे सर्व राजकीय भविष्य सांगून जात आहे.प्रशासनाच्या वतीने असणारे सर्व उपक्रम राबवून ते जनतेपर्यंत पोहचवत असून टिंगरे यांनी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम जनतेपर्यंत पोहचवून याची त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात अंमलबजावणी करून प्रभागातील डोंगरावर विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपन करून परिसर प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.याबरोबरच मतदार संघातच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ राजकीय जानकारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली असल्याचे चित्र मतदार संघात पाहायला दिसून येत असून प्रभागातच नव्हे तर मतदार संघात देखील भावी आमदार म्हणून त्यांच्या नावाचे फ्लेक्स आत्तापासूनच झळकू लागले असून त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात कोणी ही मातबबर उमेदवार उभा राहिला तरी बॉबी टिंगरे यांनाच आमदार म्हणून कार्य करण्यासाठी आता पालिका सभागृहात नाही तर विधानसभेत पाठविण्याचा चंगच कार्यकर्त्यांनी नाही तर मतदारांनी देखील बांधल्यामुळे उमेदवारीचे प्रबळ दावेदार म्हणून अनिल टिंगरे यांच्याकडे पाहिले जात असून मतदार संघात त्यांचेच पारडे जड असल्याचे केलेल्या सर्व्हेनुसार पाहायला मिळत आहे.यामुळे टिंगरेंनी देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड थोपटून विरोधकांना एक प्रकारे आव्हान निर्माण करून त्यांना कात्रजचा घाट दाखविण्याचे मनाशी गाठ बांधली आहे._ ओळ___

Post a Comment

0 Comments