सोमनाथ साळुंके
आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे येरवडा भागातील शांतीनगर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने या भागास विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी पाहणी करून पाण्यात अडकलेल्या आजीस त्यांनी मदतीचा हात दिला आहे सध्या शहरासह उपनगर भागाला जोरदार मुसळधार पावसाने झोडपले आहे.त्यामुळे विविध भागातील जनजीवन विस्कळीत होऊन उपनगर भागातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन अनेक सोसायटीच्या तळमजल्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असताना यास अपवाद शांतीनगर झोपडपट्टी देखील राहिली नसून मुठा नदी किनारी वसलेल्या या झोपडपट्टी भागांना दरवर्षी होणाऱ्या पुराचा फटका बसून परिसरातील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करण्याची वेळ येत आहे.यामध्ये प्रामुख्याने पालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे परिसरात ड्रेनेज व पावसाळी लाईनच्या पाण्याचा प्रवाह यामधून जात नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील साहित्याचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांना रात्र जागून काढण्याशिवाय पर्याय राहत नाही.गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली.शांतीनगर भागातील अनेक घरांनी पुन्हा पाणी शिरून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली.यावेळी गुरुवारी दुपारच्या सुमारास या भागात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्यात अनेक वयोवृध्द नागरिक अडकल्याने त्यांना पाण्यातून मार्ग काढणे सोडाच पण घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले होते.यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे या भागात पूरपरिस्थितीची पाहणी करण्यास गेले असताना काही वयोवृध्द नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचा थोडा ही विलंब न करता वयोवृध्द नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली.यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मुख्य असलेल्या अडचणी समजावून घेतल्या.यादरम्यान परिसरातील पुरामुळे नागरिकांचे होणारे नुकसान यावर लवकरात लवकर सोडविण्याचा दावा टिंगरे यांनी व्यक्त केला.यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करून सुटकेचा मोकळा श्वास सोडला.यावेळी त्यांच्यासमवेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते._
मतदार वर्गानी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेत जाण्याची संधी दिल्यामुळे मतदार संघातील नागरिकांचे असलेले प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून मतदार संघातील असलेले प्रश्न सोडवण्यास मी वचनबध्द राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी देखील अडचणी असतील तर त्या मला सांगून नागरिकांची देखील विकासकामांच्या दृष्टीने नागरिकांची मला सहकार्याची गरज आहे..__सुनील टिंगरे_आमदार_वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ___
Post a Comment
0 Comments