Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

संरक्षक भिंत असून ही जीव धोक्यात ,उपायुक्तांनीच फोन उचलण्यास केली टाळाटाळ,पालिका अधिकारी गेले सक्तीच्या रजेवर,शांतीनगर वासियांनी मांडली व्यथा,


     माझा हात तुटला आहे.त्यामुळे मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून रजेवर आहे.__ज्योती भालेराव_अभियंता_येरवडा क्षेत्रीय कार्यालय___
   सोमनाथ साळुंके 
गेली वीस वर्षे उलटून देखील शांतीनगर भागातील संरक्षक भिंत बांधून ही झोपडपट्टीतील नागरिकांना आज ही पूरपरिस्थितीस सामोरे जाण्याची वेळ येत असून सहायक आयुक्तच सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिकांना न्यायाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ येत आहे.
           विश्रांतवाडी परिसरातून खडकीकडे जाणाऱ्या मांर्गावर मुठा नदीकिनारी शांतीनगर झोपडपट्टी गेली अनेक वर्षापासून वसलेली आहे.जवळपास दहा हजार लोकसंख्या असलेल्या या भागातील स्थानिक नागरिकांना दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पूरपरिस्थितीस सामोरे जाण्याची वेळ येत आहे.विशेष म्हणजे धानोरी,विश्रांतवाडी,लोहगाव आदी भागातील पावसाळी पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी पालिकेच्या वतीने झोपडपट्टी परिसरातूनच ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे.त्यातच यापूर्वी झोपडपट्टी लगत यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात न आल्यामुळे नदीचे पाणी हे परिसरातील अनेक घरांनी शिरत असल्यामुळे नागरिकांच्या घरातील साहित्यांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था परिसरातील पालिकेच्या शाळांनी करण्यात येत होती.त्यामुळे नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाच्या वतीने वीस वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून झोपडपट्टी परिसरालगत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे
_जनतेचे मुख्य प्रश्न सोडवण्यास अधिकारी असमर्थ ठरत असतील तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही._सचिन भोसले__,काँग्रेस उपाध्यक्ष_वडगाव शेरी विधानसभा___
मात्र एवढे करून ही परिसरातील असणारी परिस्थिती जैसे थे आहे.टाकण्यात आलेल्या पावसाळी व ड्रेनेज लाईन ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जाण्यास मार्गच राहत नसल्याने त्या तुंबून त्यामधील सांडपाणी उघड्यावर वाहून व संरक्षक भिंत बांधून देखील नदीचे पाणी झोपडपट्टीमध्ये शिरत असल्यामुळे येथील नागरिकांच्या घरांनी पावसाचे पाणी शिरत असल्याने येथील नागरिकांना आता जगणे देखील अवघड झाले आहे.पावसाच्या व सांडपाणी जलवाहिनीचा इतक्या मोठ्या प्रमाणात असते.नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड होऊन या भागातील बनविण्यात आलेले सिमेंटचे रस्ते उखडून गायब झाले आहेत.अनेक घरांच्या समोर सांडपाणी साचून त्यामध्ये आळया सारखे जंत निर्माण होऊन व पसरलेल्या दुर्गधीच्या वासामुळे परिसरात डेंग्यू,मलेरिया यासारख्या आजारांची साथ पसरते की,काय?याची धास्ती नागरिकांच्या मनामध्ये लागून राहिली आहे.त्यातच तुंबलेल्या जलवाहिन्या साफ व्हावेत या उद्देशाने परिसरातील नागरिक वारंवार पालिकेकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी नागरिकांचे फोन उचलण्यास टाळाटाळ करत असतात.येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यापावसाळ्यात नेहमीच होणारा त्रास कोणी अधिकारी समजून घेत नसून ते सोडावीत ही नाही.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाज बाबत नाराजी सुर उमटत आहे.__._पूनम म्हात्रे_स्थानिक महिला_शांतीनगर______
 ऐवजी आजाराचे निमित्त करून चक्क रजा टाकून सक्तीच्या रजेवर गेल्याने तक्रार द्यायची कोणाकडे?हा विचार येथील नागरिकांना पडला असून पालिकेच्या कोठीवर काम करणारे कर्मचारी देखील नागरिकांच्या समस्याच काय?पण फोन उचलण्यास देखील टाळाटाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी न्यू स्टार न्युज इंदियाशी बातचीत करताना सांगितले आहे.यामुळे अधिकारी मोठे की,कर्मचारी मोठे हा विचार नागरिकांना पडला आहे.
याबाबत पालिकेच्या परिमंडळ १ उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याशी फोन वरून न्यु स्टार न्यूज इंडिया प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त करून पालिकेचे अधिकारी हे जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.या भागातील महिलेला तर साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे घर सोडून जाण्याची वेळ आली आहे.जर पालिकेचे अधिकारीच नागरिकांचे प्रश्न न सोडविता अपमानास्पद वागणूक देत असतील तर नागरिकांनी न्याय कोणाकडे?मागायचा असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.अधिकाऱ्याकडून येथील नागरिकांना नेहमीच मिळणाऱ्या उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने येथील नागरिक मिळणाऱ्या उत्तरामुळे हैराण झाले असून जनतेचे असलेले मुख्य प्रश्न अधिकारी सोडवण्यास असफल ठरत असतील तर परिसराचा पालिकेत समावेश करून उपयोग काय?हा प्रश्न येथील नागरिकांना अनेक वर्षापासून सतावत आहे.त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेचे गंभीर समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.___





Tags

Post a Comment

0 Comments