श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना दिंडीचे महत्व, वारकऱ्यांचा दिनक्रम, बंधुभाव, सेवाभाव व राष्ट्रीय एकात्मता समजावी यासाठी सुंदरबाई मराठे विद्यालय प्राथमिक विभागात यंदाचा पालखी सोहळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय संस्कृतीचे बाळकडू विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विद्यालयांमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील 800 विद्यार्थी पालखीमध्ये सहभागी होते. या बालवारक-या मार्फत पर्यावरणाचा संदेश देणे व वारीच्या रस्त्यावर झाडांची लागवड करणे, वारकऱ्यांना विद्यार्थ्यांनी शाळेत मध्ये बनवलेले सीडबोल व विविध जातीच्या वनस्पतींच्या बियांचे पाकिटे वाटप करणे असे विविध कार्यक्रम या पालखी अंतर्गत घेण्यात आले.
शाळेपासून ते वडगाव शेरी मधील गणेश नगर येथे स्वामी समर्थ मठापर्यंत टाळ मृदंगाच्या जयघोषात
"ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल "असा जयघोष करत त्याचसोबत "झाडे लावा झाडे वाचवा"" झाडे लावा, पर्यावरण वाचवा" "पाणी वाचवा भविष्य वाचवा" यासारख्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि ज्ञानेश्वरी ठेवून त्याचे विधिवत पूजन गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रामभाऊ मोझे साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खांद्यावर पालखी घेऊन परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण केले. सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पेहरावात वडगाव शेरी येथील स्वामी समर्थ मठात गेले. परिसरातील वारकरीही या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले होते.
गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे उपाध्यक्ष व पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक माननीय ज्ञानेश्वर मोझे साहेब संस्थेचे सदस्य माननीय संजय मोझे साहेब तसेच संस्थेच्या सदस्या व शालेय समिती अध्यक्षा माननीय प्राध्यापिका अलकाताई पाटील यांचे या पालखी सोहळ्यास मार्गदर्शन लाभले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री अनिल खांदवे तसेच सहशिक्षिका सविता ढेरंगे, शुभांगी महापुरे, राजेश दरेकर, नीता वाळुंज, लीना पवार, पल्लवी परदेशी, स्मिता भोसले, राजेश औटी,राहुल क-हे, रेखा थोरात, प्रियांका चौधरी इत्यादी शिक्षक व बहुसंख्य पालक वर्ग ही या पालखी सोहळ्यास उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments