पुणे:- सोमनाथ साळुंके
खराडी भागात फायर ब्रिगेडच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली इमारत धूळखात पडून असल्याने ही इमारत तळीरामांचा अड्डा बनून कार्यालयासमोरच चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना इमारतीचे उदघाटन कधी होणार?या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे
शहरात अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात पावसामुळे पूरपरिस्थिती होणे,आगीच्या घटना आदी आपत्कालीन घटना घडत असल्याने अशा संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेड विभागास पाचारण केले जाते.यापूर्वी शहरातील ठराविक भागातच फायर ब्रिगेडचे कार्यालय असल्याने व शहराची संख्या देखील झपाट्याने वाढल्याने वाहतुकीच्या वर्दळमध्ये फायर ब्रिगेडचे वाहन जाण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना आगीच्या अथवा पुराच्या निर्माण होणाऱ्या संकटेस सामोरे जाण्याची वेळ येत होती.त्यामुळे नागरिकांची असलेली मुख्य समस्या लक्षात घेऊन फायर ब्रिगेड प्रशासनाच्या वतीने उपनगर भागातील कोरेगाव पार्क,येरवडा,लोहगाव,वाघोलीसह खराडी परिसरात फायर ब्रिगेडचे कार्यालय उभारण्यात आले आहे.मात्र खराडी भागातील कार्यालयाची इमारत जरी उभारण्यात आली असली तरी पण सध्याच्या परिस्थितीत हे कार्यालय धूळखात पडून आहे.इतर उपनगर भागापाठोपाठ वडगाव शेरी,चंदननगर व खराडी भागात सध्या खाजगी कंपन्यांचे जाळे पसरल्यामुळे परिसरात लोकसंख्येत देखील अधिक भर पडल्याचे या भागात पाहायला मिळत आहे.त्यामुळे या भागातील घडणाऱ्या अनुचित घटना टाळण्यासाठी खराडी_हडपसर बायपास रस्त्यालगत अर्धा ते पाऊण एकरमध्ये फायर ब्रिगेडची तीन मजली प्रशस्त इमारत उभारण्यात आली आहे.मात्र इमारतीच्या प्रवेशव्दार समोरच पावसाचे पाणी साचून रस्ता चिखलमय झाल्याने येथून कार्यालयात जाताना नागरिकांना अनेक अडचणीस सामोरे जाण्याची वेळ येत आहे.तर ऐन पावसाळ्यात इमारतीच्या तळमजल्यावर पावसाचे गुडघाभर पाणी साचून राहिल्याने या भागात डासांच्या प्रमाणात वाढ होऊन परिसरातील सोसायटीमधील नागरिकांना डासांचा सामना करण्याची वेळ येऊन परिसराच्या आवारात डेंग्यू,मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होऊन इमारतीच्या आवारातील साचलेले पावसाचे पाणी अनेक घरांनी शिरून नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली होती.इमारती समोरच चीखलमय झालेला रस्ता,इमारतीच्या आवारातच अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या बाटल्या
विशेष म्हणजे फायर ब्रिगेड प्रशासनाच्या वतीने प्रवेशव्दार जवळ अद्याप ही सुरक्षारक्षक अथवा रखवालदार नेमण्यात न आल्याने असलेले कार्यालय हे सध्या तळीरामांचाअड्डा बनला आहे.बंद असलेल्या या कार्यालयाचा गैरवापर होऊन येथील मोकळ्या जागेत अनेक दारुडे हे मनसोक्तपणे दारू पिण्याचा आनंद लुटून दारूच्या बाटल्या परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याने या भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दारू अड्ड्या मुळे गंभीर बनला आहे.खराडी भागानंतर लोहगाव वाघोली भागाचा महापालिकेत समावेश होऊन देखील तेथील उभारण्यात आलेले फायर ब्रिगेडचे कार्यालय कार्यान्वित आहे.मात्र येथील इमारत अद्याप ही सुरू करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार उजेडात येऊन अधिकारी हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.यामुळे परिसरात एखादी गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडली तर यास फायर ब्रिगेड प्रशासन जबाबदार राहील असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.तरी वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन गेली अनेक महिने उदघाटनाच्या प्रतीक्षेत बंद असलेले फायर ब्रिगेडचे कार्यालय सुरू करण्याची मागणी खराडी भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.यासंदर्भात फायर ब्रिगेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र पोटफाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.___
खराडी,वडगाव शेरी व चंदननगर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन फायर ब्रिगेड प्रशासनाच्या वतीने खराडी भागात संबंधित कार्यालय उभारण्यात आले असले तरी पण ते गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून असल्याने यासंदर्भात फायर ब्रिगेड अधिकारी तसेच पालिका आयुक्तांना ते सुरू करण्याची मागणी करून देखील अद्याप ते सुरू करण्यात न आल्याने प्रशासनाच्या कामकाजबाबत शंका उपस्थित होत आहे.त्यामुळे येथील बंद असलेले कार्यालय त्वरीत सुरू करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.__अनिल नवले_संचालक__श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट_चंदननगर
Post a Comment
0 Comments