अडकलेल्या नागरिकांची सुटका केल्यावर अग्नीशामक दलाचे पथक व संबंधित नागरिक
सौरक्षक भिंत असून ही जीव धोक्यात या बातमीमध्ये या चौकटीचा उल्लेख करावा ही आपणास विनंती_____
पुरात अडकलेल्या नागरिकांना काढले बाहेर_शांतीनगर,इंदिरानगर भागातील झोपडपट्टीलगत असलेल्या मुठा नदीला सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पुन्हा शांतीनगर व इंदिरानगर भागातील झोपड्यांमध्ये पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील सात ते आठ नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकल्याने अग्नीशामक दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.योगेश म्हसे,मुख्य अग्नीशामक दल अधिकारी देवेंद्र पोटफाडे,मुख्य अभियंता अशोक भालकर,अधीक्षक शिवप्रसाद बागडी,उपअभियंता वसंत नाईक,सुभाष मोरे,कनिष्ठ अभियंता सुभाष मोरे,अजिंक्य जगताप,ज्ञानेश्वर आतकरे,स्वरूप शिरागुप्पे यांनी संबंधित नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून त्यांना सुरक्षास्थळी हलविण्यात आले.यावेळी या भागातील नागरिकांना नानासाहेब परुळेकर व आण्णाभाऊ साठे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था पालिकेच्या वतीने करण्यात येऊन यावेळी वडगावशेरी विधानसभेचे माजी आमदार बापूसाहेब पठारे व त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी या भागाची पाहणी करून पुरातून सुटका झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.__
Post a Comment
0 Comments