Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

क्रीडा संकुल अधिकाऱ्यावरच उपासमारीची वेळ,अधिकारी वर्षभरापासून पगारापासून वंचितच,अधिकाऱ्याचा पगार अजून प्रशासनाच्या खिशातच

    प्रतिनिधी पुणे :  सोमनाथ साळुंके
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणाऱ्या क्रीडा संकुल विभागात उच्चपदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचाच पगार वर्षभरापासून राज्य क्रीडा प्रशासनाकडून देण्यात न आल्याने या अधिकाऱ्यावर सध्या उपासमारीची वेळ आली असून ही चिंतेची बाब बनली आहे.
       संबंधित अधिकाऱ्याने  न्यू स्टार न्यूज इंडिया शी बातचीत करताना नाव न टाकण्याच्या अटीवर मांडलेली आपली व्यथा मांडली आहे.सध्या शहरात सिमेंटच्या इमारतींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे शहरातील अनेक मुले ही विविध खेळापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अशा मुलांना खेळाचा आनंद मिळावा. व खेळाच्या विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्य क्रीडा प्रशासनाच्या वतीने शहरातील येरवडा भागातील नागपूर चाळ परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा संकुल उभारण्यात आले असून या ठिकाणी जलतरण तलावसह बॉक्सिंग,बॅडमिंटन,तिरंदाजी,क्रिकेट आदी खेळाची मैदाने उभारण्यात आल्याने या भागातील नव्हे तर शहरातील विविध क्षेत्राची आवड असलेली मुले अथवा तरुण हे येथे सराव करण्यासाठी येत असल्याने राज्य प्रशासनास या खेळाडूंच्या मिळणाऱ्या उत्पंनातून वर्षभरात लाखो रुपयांचा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येथील मैदानावर तसेच मुलांच्या गरजा समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र राज्य प्रशासकीय विभाग कार्यरत आहे.अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली येथील कारभार सुरळीतपणे सुरू आहे.त्यातच स्वतंत्र विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाच ते सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी बदली झाली आहे.मात्र लाखो रुपये पगार घेत असलेल्या व संबंधित पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यास वर्षभरापासून पगारच देण्यास राज्य क्रीडा प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले असताना या अधिकाऱ्यास वर्षभरापासून पगारच मिळत नसल्याने घरसंसार चालवायचा कसा काय?हा मुख्य प्रश्न संबंधित अधिकाऱ्यास वर्षभरापासून सतावत आहे.वर्षभरापासून शासनाकडून वेतनच मिळत नसल्याने या अधिकाऱ्यास मित्र मंडळी अथवा नातेवाइकांकडून व्याजाने कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ येत आहे.त्यामुळे इतर नागरिकांकडून किती दिवस व्याजाने रक्कम घेऊन घरसंसार चालविणार हा मुख्य प्रश्न या अधिकाऱ्यास गेल्या वर्षापासून सतावत आहे.कारण ज्यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली आहे.अशा नागरिकांकडून पैशाचा तगादा देखील अधिकाऱ्याच्या मागे लागल्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून जर अधिकाऱ्याने जीवाचे काही बरे वाईट केले तर यास जबाबदार कोण?राहणार असा संतप्त सवाल देखील संबंधित अधिकाऱ्याने बोलून दाखविला आहे.त्यातच घरसंसार सांभाळताना अधिकाऱ्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील येऊन ठेपल्याने मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये.याकरिता देखील हे अधिकारी पैशासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.विशेष म्हणजे एखाद्या शासकीय कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचे वेतन वाढ अथवा पगार वेळेत होत नसेल तर अनेक संघटनेच्या वतीने शासकीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन किंवा उपोषण छेडण्यात येत असताना संबंधित एकट्याच अधिकाऱ्याचे वेतन रखडले गेल्याने ही अडचण ते इतरा पुढे देखील बोलू शकत नाही.त्यामुळे त्यांना न्यायासाठी शासनाची दारे ठोठावण्याची  वेळ येत आहे.येथील क्रीडा संकुल उभारण्यासाठी राज्य प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तो उभारण्यात आला असताना प्रशासन साधे एका अधिकाऱ्याचा पगार देण्यासाठी वर्ष उलटून देखील तो देत नसल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.तर क्रीडा संकुल विभागातील सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला असताना देखील जर या अधिकाऱ्याचे वेतन देण्यास प्रशासनाकडून डावलले जात असेल तर हा चर्चेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे अधिकाऱ्यास येण्याजाण्यासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांच्या या खर्चाचा बचाव होत आहे.याबाबत अधिकाऱ्याने गेल्या वर्षापासून वारंवार प्रशासनाकडे वेतनाबाबत पाठपुरावा करून देखील तो मिळत नसल्याने अधिकारी हे हैराण झाले आहेत.जर शासकीय अधिकाऱ्यांची सद्य परिस्थिती अशा प्रकारची असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय?परिस्थिती असेल हे न मिळणाऱ्या वेतनामुळे सांगणे कठीण आहे.शहरातील विविध शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही पदाधिकारी यांची देखील अशा प्रकरचीच बहुतांश प्रमाणात परिस्थिती आहे.मात्र त्यांचे असणाऱ्या पदांमुळे व भीतीमुळे ते सांगण्यास टाळाटाळ करत असल्याची शंका संबंधित अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे.ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे पुण्याचे काम होत आहे.त्याच अधिकाऱ्यास वर्षभरापासून वेत नापासून वंचित राहण्याची वेळ येत असेल तर ही चिंतेची बाब असून राज्य क्रीडा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याचे वेळेत वेतन करावे.जेणे करून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.या मागणीला जोर धरू लागला आहे.तरी लवकरात लवकर असणारे वेतन मिळावे ही मागणी संबंधित अधिकाऱ्याकडून होत आहे.
                    क्रीडा संकुल विभागाची प्रशस्त इमारत
जर प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्याचे वर्षभरापासून वेतन थकले असेल तर ही चिंतेची बाब असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्याचे वेळेत वेतन द्यावे._निरंजन मराठे_स्थानिक नागरिक_येरवडा__
प्रशासकीय अधिकाऱ्याचेच वर्षभरापासून पगार होत नसेल.यासारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही.त्यामुळे अधिकाऱ्याची अडचण लक्षात घेऊन त्यांचा पगार वेळेत प्रशासनाने देणे बंधनकारक आहे.__स्वप्नील माने_युवा प्रदेशाध्यक्ष_सामर्थ्य जनशक्ती संघटना

Post a Comment

0 Comments