पुणे प्रतिनिधी :- सोमनाथ साळुंके
विश्रांतवाडी परिसरात दोन दिवसापूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या गोमातेचे पोलिसांनी धार्मिक पध्द्तीने अंत्यविधी केल्याने येथील पोलिसांनी समाजापुढे एक वेगळाच आदेश दाखवून दिला आहे.
एकीकडे खाकी वर्दी पाहिली की,समाजातील सर्वसामान्य नागरिकांना घाम फुटतो.पण याच खाकी वर्दीने समाजाला माणुसकी काय?असते हे दाखवून दिले आहे.आज शहरातील विविध मार्गावर गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकांना जीव गामविण्याची वेळ येते.अनेकदा अपघातातील मृतदेह हे रस्त्यावर तासनतास पडून असतात.मात्र पोलीस आल्याशिवाय अशा मृतदेहाला कोणी व्यक्ती साधा हात देखील लावू शकत नाही.माणसाचीच अशी अवस्था होत असेल तर मुक्या प्राण्यांचे तर सांगणे अवघड आहे.कारण रस्त्यावर झालेल्या अनेक अपघातात मृत्युमुखी पडलेली जनावरे तर वासाने सडून जातात.मात्र रस्त्यावरून येणारे जाणारे मृत जनावरे यांच्याकडे साधे पाहत देखील नाही.मात्र याचेच प्रायचीत्य म्हणून काय?विश्रांतवाडी पोलिसांनी अपघातातील मृत गोमातेवर हिंदू धार्मिक परंपरेनुसार अंत्यविधी करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे.यासंदर्भात सिविक मिररने घेतलेली माहिती अशी की,दोन दिवसापूर्वी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत बॉम्बे सॅपरस वसाहती नजिक रस्त्याने चालत असलेल्या गोमातेस(गाई) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे गोमाता ही घटनास्थळीच गतप्राण झाली असताना रस्त्याने येणारे जाणारे नागरिक फक्त मृत्युमुखी पडलेल्या गाईस पाहून पुढे जात होते.मात्र त्या गाईस थोडेसे पाणी पाजण्याची तसदी देखील कोणी नागरिकांना न घेता फक्त बघ्याची भूमिका घेऊन पुढे जात होते.आपला समाज हा गाईच्या रुपात तेराशे कोटी देवतांना पाहून तिचे पूजन करत असतो.मात्र अपघातात मृत झालेल्या गाईस पाहून अनेकांनी खंत देखील व्यक्त केली.पण गाईचे एवढे वजन असल्याने तिला उचलणे देखील कठीण झाले होते.पण याची माहिती विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आळंदी रोड पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख व पोलीस कर्मचारी कृष्णा माचरेकर यांना समजताच त्यांनी वेळेचा विचार न करता घटनास्थळी धाव घेतली असताना गोमातेला कोणी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ती गतप्राण झाल्याची माहिती मिळताच शेख यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. व नंतर संबंधित गाईचा अंत्यविधी कसा करायचा हा सर्वांसमोर एक प्रश्न उभा राहिला असताना तिला उचलायचे कसे काय?हा गंभीर प्रश्न होता पण शेख यांनी थोडासा विचार करून मृत गाई उचलण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला.त्यानंतर एका ट्रकच्या साहाय्याने या गाईस भोसरी येथे असलेल्या गोमाता शाळा पांजरपोळ येथे नेऊन तिला हिंदू धार्मिक परंपरेनुसार तिच्यावर अंत्यविधी करून तिला दफन करण्यात आले.शेख यांनी मृत जनावराव र केलेल्या अंत्यविधीबाबत परिसरात हा चर्चेचा विषय बनून त्यांचे मुक्या प्राण्यावर असलेले प्रेम दाखवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. व त्यांनी पोलीस वर्दीतील असलेली माणुसकी अजून संपलेली नाही.हे समाजाला दाखून दिल्याने त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून अन्सार शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यामुळे एखाद्या गंभीर अपघाताच्या घटनेत मुके जनावर दगावले तर त्यास वाऱ्यावर न टाकता आपल्या मनातील माणूस जागा करून समाजाला मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन अन्सार शेख यांनी केले आहे.___
अशा गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन अनेक मुक्या प्राण्यांना जीव गंविण्याची वेळ येते.मात्र नागरिकांनी अशी काही गंभीर घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा जेणे करून पोलीस देखील घटनेबाबत तात्काळ उपाय करतील.
अन्सार शेख ,साहायक पोलिस निरीक्षक,विश्रांतवाडी पोलिस स्टेशन,
Post a Comment
0 Comments