संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारी निमित्त अखिल भारतीय सेना (ABS) या पक्षाच्या वतीने दि.02/07/2024 रोजी हडपसर, पुणे येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी भक्तांना सालाबाद प्रमाणे या हि वर्षी फराळी पदार्थ,फळे,पिण्याचे पाणी वाटप करून वारकरी भक्तांची सेवा करण्यात आली.सर्वत्र माऊलींचा जयघोष, टाळ - मृदंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात होते.
अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस व
अखिल भारतीय वारकरी संप्रदाय सदस्या आदरणीय
सौ.आशाताई गवळी(मम्मी), पुणे जिल्हाध्यक्ष श्री.शनिभाऊ शिंगारे,हडपसर विधानसभा मतदार अध्यक्ष कु.मयुरीताई,बामणे,माहितीचा अधिकार कार्यकर्ते श्री.प्रदिप भाऊ रावते,न्यु स्टार न्युज इंडिया पत्रकार, श्री.नागेशभाऊ देडे,ऋषीभाऊ बामणे,कु.अतुल डवणे यांच्या सह अनेकांनी पालखीचे दर्शन घेतले,रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
Post a Comment
0 Comments