सोमनाथ साळुंके
नेहमीच येणाऱ्या वाढीव वीजबिलामुळे वडगाव शेरीकर हैराण झाले आहेत.यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वाढीव बिलाबाबत पाढाच वाचल्याने याविरोधात महावितरणकडून नागरिकांच्या समस्येचे निवारण न झाल्यास भाजपकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वडगाव शेरी,खराडी भागात महावितरणचे विभागाचे जवळपास एक लाखाहून अधिक वीजग्राहक आहेत.त्यामुळे ग्राहकांचे वीजेचे असणारे मुख्य प्रश्न मार्गी लागावेत या उद्देशाने नगररोड विभाग अंतर्गत वडगाव शेरी,खराडी,पाचवा मैल या उपनगरात महावितरणकडून उपकेंद्र उभारण्यात आले आहे.त्यामुळे वीजेचे नागरिकांचे असलेले प्रश्न मार्गी लागत आहे.याबरोबरच वीजग्राहकांना वेळेत वीजबिल मिळावेत ह्या हेतूने वीजमीटरचे रिडिंग घेऊन ग्राहकांना वीजबीले वाटप करण्याचे काम या विभागाकडून खाजगी ठेकेदारांना देण्यात आले आहे.मात्र ठेकेदाराकडून वेळेत वीजमीटरचे रिडिंग घेण्याचे काम अनेकदा घेतले जात नसल्याने व अनेकदा मागील वीज बिलावरच बिले वाटप करण्याचे काम ठेकेदाराकडून केले जात आहे.मात्र रिडिंग उशिरा घेतल्याने नागरिकांना देखील अनेकदा वीजबिल उशिरा वाटप होत असल्याने अशा वेळेत बील भरण्यास उशीर झाला तर ग्राहकांना नोटीस न पाठवताच मीटर काढून घेतले जात असल्याने अनेकदा नागरिकांना रात्र अंधारात जागून काढण्याची वेळ येत आहे.त्यामुळे वीजग्राहकामध्ये याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.यापूर्वी नागरिकांना कमीत कमी हजार ते दिड हजार रुपये येणाऱ्या वीजबिलाने त्याहून देखील अधिक टप्पा ओलांडल्यामुळे घरसंसार चालवायचा की मुलांचे शिक्षण पाहायचे हा प्रश्न अनेक कुटुंब प्रमुखांना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भेडसावत असून अगोदरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना त्यात अधिक वाढीव वीजबीलांची भर पडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे देखील कठीण झाले आहे.यामुळे चूक कोणाची व सजा कोणाला?असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे.यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा महावितरण अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील अधिकारी हे नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी वीजग्राहकांना अरेरावीची भाषा करत असल्याची ऐकण्याची वेळ येत आहे.यामुळे अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीचा फटका नागरिकांना बसत असल्याने या विरोधात नागरिकांमध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचे सुर उमटत आहेत.तर अनेक ग्राहकांनी नवीन वीजजोड घेण्यासाठी महावितरण विभागाच्या कल्याणीनगर येथील मुख्य कार्यालयात अर्ज करून देखील नवीन विजमीटर आले नसल्याची करणे वारंवार मिळत न सल्यामुळे नागरिकांना चकरा मारण्याशिवाय पर्याय राहत नसल्याने महावितरण अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास महावितरण विभागाचे अधिकारी खरोखर च सक्षम आहेत का?हा मुख्य सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.यामुळे येणाऱ्या वाढीव वीजबिलामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी वडगाव शेरी भागाचे माजी नगरसेवक योगेश मुळीक यांच्या समोर नागरिकांनी वाढीव वीजबिलबाबत पाढाच वाचला.यावेळी सागर काळे,संतोष घोलप,राजू घुले,महेंद्र चांधारें,विपुल राऊत,लक्ष्मण तीपे,जितेंद्र तेली,कुशल जठवार,सतीश लोंढे,शशी बोडके आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असताना नागरिकांनी मुळीक यांच्याकडे वाढीव वीजबिल संदर्भात तक्रार केली.___
वीजग्राहकांनी येणाऱ्या वाढीव वीजबिल बाबत कनिष्ठ अधिकारी प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत असतील तर ग्राहकांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणे करून जनतेचे असलेले प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देऊ._प्रशांत ढेरे_अतिरिक्त कार्यकारी अभियंता_नगररोड विभाग_
वाढीव वीजबिलच्या समस्येच्या विळख्यात अडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मुख्य प्रश्न सोडविं ण्यास पक्ष वचनबध्द राहील._अरविंद गोरे_भाजप सरचिटणीस_पुणे शहर___
वडगाव शेरी भागातील नागरिकांनी वाढीव वीजबिलसंदर्भात अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करून देखील महावितरणचे अधिकारी जनतेचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत असतील.तर जनतेच्या हितासाठी वेळप्रसंगी आंदोलन छेडणार_योगेश मुळीक_माजी नगरसेवक_वडगाव शेरी__
Post a Comment
0 Comments