सोमनाथ साळुंके
भारतनगर येरवडा परिसरात धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्या हल्लेखोर आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर असलेल्या भारतनगर परिसरात बुधवार (दि.१९)रोजी रात्री दहाच्या सुमारास आठ ते नऊ जणांचा टोळक्यांनी हातात कोयता,पालघर,कुऱ्हाड आदी धारदार हत्यारे हातात घेऊन परिसरातील असलेल्या दुकान व्यावसायिकासमोर हत्यारे हवेत फिरवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी आरोपी यांनी या ठिकाणी असलेल्या राहुल छजलानी यांच्या बंद चहाच्या दुकानावर हत्याराने प्रहार केला होता.त्यातच यालगत असलेल्या कैलास कुसाळकर यांच्या पानटपरीकडे हल्लेखोरानी मोर्चा वळवून त्यास राहुलच्या घराचा पत्ता विचारल्यावर त्याने मला माहित नसल्याचे सांगताच हल्लेखोर टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी तो बाजूला हटल्यामुळे तो हल्ल्यातून बालबाल बचावला. टोळक्यांनी त्यावेळेस हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये दहशत पसरून नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले होते.हल्लेखोरांच्या दहशतीमुळे येथील व्यावसायिकांनी तात्काळ दुकाने बंद करून घटनास्थळपासून पळ काढला होता.विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी राहुल याची पत्नी पल्लवी व आई बबिता छजलानी हे नुकतेच दुकान बंद करून घरी गेल्यामुळे ते या हल्ल्यातून बालबाल बचावले होते.तर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्यावेळेस पोलिसांची चाहूल लागताच हल्लेखोर घटनास्थळाला पासून फरार झाले होते.मात्र परिसरात सीसीटिव्ही मध्ये सर्व हल्लेखोर कैद झाल्यामुळे हल्ले खोरांना लवकर अटक करण्यात पोलिसांना यश आले.घटनेचा पुढील तपास पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलिस आयुक्त मनोज पाटील,परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर,विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्यासह दिपक(भाऊ) चव्हाण,यशवंत किरवे,शेखर खराडे,संदिप देवकाते,संपत भोसले आदी पथकाने सीसीटिव्ही तपासून आरोपींना चोवीस तासात ताब्यात घेण्यात यश मिळविले.यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपींनी परिसरात दहशत पसरविण्याचा का?प्रयत्न केला याचा सर्व तपास करायचा असून हल्लेखोर विरोधात छजलानी कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून लहल्लेखोर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होता.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत._
Post a Comment
0 Comments