प्रतिनिधी सोमनाथ साळुंके,:- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे विचार आचरणात आणून तळागाळातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे (ठाकरे गट) उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी व्यक्त केला. महिलांना साडी वाटप करताना आनंद गोयल व इतर
उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गोरगरीब व गरजुवंत महिलांना वाढदिवस मोठ्या गाजावाजात साजरा न करता साड्या वाटप करण्यात आल्या.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास विभाग प्रमुख विशाल पाटील,प्रशांत राणे,सतीश मुळीक,तात्या मलके,सोमनाथ खांदवे,यशवंत शिर्के,संजय वाल्हेकर,सचिन खांदवे,पाला मोरे,अमृता पठारे,प्रमोद परधे,विलास नलावडे,अक्षय इथापे,राजेश एरंडे,मनोज अगरवाल,असिफ शेख,राहुल शेंडगे,अशोक अगरवाल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.गोयल पुढे म्हणाले की,सध्या समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे या मुख्य संकटातून बाहेर पडणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे.कारण समाजातील अनेक कुटुंब प्रमुख दिवसभर मिळेल ती मोलमजुरी मिळाल्यानंतरच संध्याकाळची त्यांची एकवेळची चूल पेटत आहे.त्यामुळे अनेक महिला ह्या अशिक्षित असताना देखील कुटुंबांना हातभार लागावा या उद्देशाने घराच्या बाहेर पडून साफसफाईसह धुण्याभां ड्याची कामे करून कुटुंबाला हातभार लावत आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.त्यामुळेच मोठ्या गजावाजात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा अशा कुटुंबातील महिलांचा माझ्या व इतर सहकाऱ्यांच्या हातून सत्कार होत आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटत असून हिंदुहृदयसम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आम्हा शिवसैनिकांना हीच शिकवण दिली आहे की,समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेचे मुख्य समस्या सोडविण्यावर शिवसैनिकांनी भर देण्यास प्राधान्य दिल्यास पक्षाची असणारी ताकद वाढण्यास त्यांच्या सहकार्याने मदत होईल.यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले घवघवीत यश याचे ताजे उदाहरण असून नागरिकांनी देखील काही अडचण असल्यास त्या प्रामुख्याने मांडाव्यात जेणे करून असलेले प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देऊ असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन खांदवे,संजय वाल्हेकर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments