सोमनाथ साळुंके
शहरासह उपनगर भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने झोडपल्यामुळे चाकरमान्यांची यामुळे मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली तर धानोरी,लोहगाव मार्गावर रस्त्यावरच महापूर आल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांसह चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली.यादरम्यान वडगाव शेरी, येरवडा,विश्रांतवाडी,धानोरी,लोहगाव आदी भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. धानोरी_लोहगाव मार्गावरील धानोरी गावठाण परिसरातील विठ्ठल मंदिरासमोर रस्त्यावर तर एकदम महस्पुर आल्याचे चित्र निर्माण झाले होते.यावेळी या भासगातील अनेक सोसायट्यांनी पाणी शिरल्याने सोसायटीधारकांना तर पावसात मार्ग काढताना कसरत करूनच वाहन चालविण्याची वेळ आली रस्त्यावरील महापुरामुळे धानोरी_लोहगाव मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबवर रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.हा महापूर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की,रस्त्यावरील अनेक चारचाकी वाढणे पाण्यावर तरंगत होती.एवढ्या वर्षाच्या काळात प्रथमच या मार्गावर महापूर आल्याने नागरिकांची देखील पाहण्यासाठी गर्दी झाली होती.महापूर इतक्या मोठ्या प्रमाणात आळा होता की,या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी येरवडा वाहतूक नियंत्रण कक्षास प्रत्यक्षात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची वेळ आली.यावेळी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्यासह कर्मचारी दिपक(भाऊ)चव्हाण,शेखर खराडे,यशवंत किरवे,संदिप देवकाते हे कर्मचारी मदतीला धावून गेले.यावेळी महापूरमध्ये अडकलेली वाहने काढण्यास मदत केली.तर खराडी भागातील आपलं घर सोसायटी परिसरात देखील झालेल्या पावसामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप येऊन अनेक घरांनी पाणी शिरल्यामुळे अनेक घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर येरवडा परिसरात देखील कल्याणीनगर,लक्ष्मीनगर, जयजवांननगर आदी परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.याबरोबरच अग्रेसन शाळेसमोर देखील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली होती.याबरोबरच पुणे_नगर महामार्गावर टाटा गार्डून,शास्त्रीनगर,येत्वडा गाडीतळ,आंबेडकर चौक आदी भागात झालेल्या पावसामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले.यावेळी अग्रेसन शाळेसमोर गुडघाभर पाणी साचल्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली होती. येरवडा आळंदी मार्गावर देखील जवळपास दोन ते अडीच किमी वाहनांच्या लांबवर रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक शैलेश शंखे हे ही कोंडी सोडविण्यासाठी स्व तहुन हजर होते.दोन ते अडीच तास सुरू झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.झालेल्या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे पालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईनची करण्यात आलेली कामे ही निकृष्ट दर्जाची झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.आळंदी मार्गावरील वाहतूक कोंडी तर जवळपास अर्धा ते एक तासाहून अधिक वेळ असल्याने या मार्गावर विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर या परिसरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.दोन ते अडीच तासानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.पाऊस सुरू असताना येरवडा भागातील लक्ष्मीनगर,जयजवांननगर,शास्त्रीनगर यासह धानोरी भागातील परांडेनगर,भैरवनगर,भिम नगर धानोरी गावठाण आदी भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता._
Post a Comment
0 Comments