Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

येरवड्यात गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त

  
येरवड्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने छापे मारून गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात येरवडा पोलिसांना यश येऊन यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीमुळे समाधान व्यक्त केले आहे.
    सध्या शहरा पाठोपाठ उपनगर भागातील लोकसंख्येचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने शहराबरोबर विशेष महत्व प्राप्त झाले असतानाच येरवडा परिसराला शहराचे प्रवेशव्दार म्हणून पाहिले जाते.त्यामुळे या भागात राज्यासह परराज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच अनेक कुटुंबांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊन उपजीविका भागविण्यासाठी परिसरात अनेक व्यावसायिकांनी अवैध असलेल्या गावठी दारू धांदयाकडे लक्ष केंद्रीत करून या भागात अनेक ठिकाणी घरोघरी गावठी दारू बनविण्याचा व तो विक्री करण्याचा व्यवसायच घरोघरी बनला आहे.यामुळे परिसरात अशा व्यावसायिकांचे जाळेच मोठ्या प्रमाणात बनल्यामुळे अनेक तरुण अशा गावठी दारुकडे आकर्षित होऊन व्यसनाधीन झाल्याचे परिसरात पाहायला मिळत आहे.त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राने डोके वर काढून परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे अवैध धद्यासह गुन्हेगारी रोखणे येरवडा पोलिसासमोर एक प्रकारचे आव्हानच होते.त्यामुळे कायदा सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने येरवडा भागातील अनेक ठिकाणी बनविणाऱ्या व बेकायदेशीरपणे गावठी दारूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर येरवडा पोलिसांच्या वतीने छापे टाकून असलेल्या चार ते पाच दारूभट्ट्यावर कारवाईची मोहीम राबवून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्याने पोलिसांच्या रोखठोक कामगिरीमुळे परिसरातील अनेक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडून समाधान व्यक्त केले आहे.सदरची कामगिरी ही पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर खडकी विभागाच्या सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास पथकातील कैलास डुकरे,दत्ता शिंदे,अनिल शिंदे,सुशांत भोसले,सागर जगदाळे,प्रशांत कांबळे,सूरज ओंबसे या पथकाने कारवाई करून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य व रसायन यावेळी जप्त करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे.घटनेचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करत असून यापुढे देखील अशा बेकायदेशीर गावठी दारू बनविणाऱ्यावर व विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे स्वप्नील पाटील यांनी सांगितले.____
येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा हा भाग बहुतांश प्रमनात झोपडपट्टी भाग म्हणून ओळखला जात आहे त्यामुळे परिसरात अवैध धांद्या चे जाळे पसरले आहे.त्यामुळे असे धंदे रोखणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.परिसरात चार ते पाच ठिकाणी मोहीम राबवून कारवाई करण्यात आली असून भविष्यात ही अशा धंद्या वर कारवाई करण्यात येईल.__स्वप्नील पाटील__पोलीस उपनिरीक्षक__येरवडा पोलीस स्टेशन__
Tags

Post a Comment

0 Comments