सोमनाथ साळुंके
बांधकाम व्यावसायिकाचा राजाश्रय व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे सुरू असलेल्या डांबर प्लांट विरोधात निरगुडीकरांनी लढा पुकारला असून यासंदर्भात प्लांट बंद करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित प्लांट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निरगुडी येथील गट क्रमांक ११९व १२४ या ठिकाणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकाने निरगुडी ग्रामपंचायतकडून गोडावून उभारण्यासाठी परवानगी घेतली होती.मात्र व्यावसायिक यास एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा राजाश्रय व राजकीय नेत्यांचा आशीर्वाद लाभत असल्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतीची दिशाभूल करून या ठिकाणी डांबर प्लांट व मिक्सर प्लांटचा बेकायदेशीरपणे कायद्याच्या नियमांना केराचे टोपली दाखवीत हा व्यवसाय सुरू केला आहे.त्यामुळे या प्लांट मधून निघणाऱ्या धूर व केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे यालागत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतीच उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुसाचा त्रास होऊन दम्यासारखे गंभीर स्वरूपाचे आजार झाले आहेत.याविरोधात स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधीर मगर यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा नातेवाईक व व्यावसायिक याने याविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्या विरोधात पोलिसांना हाताशी धरून तसेच षडयंत्र रचून गुन्हा दाखल केला आहे.याबरोबरच २०२२रोजी तहसीलदारांच्या आदेशानुसार या भागातील अनधिकृतपणे सुरू असलेला डांबर व मिक्सर प्लांट बंद करण्यात आला होता.
मात्र एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा असलेल्या नातेवाईक व व्यावसायिक याने पुन्हा तो सुरू केल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने हा प्लांट बंद व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी सुहास देवसे यांना दोन दिवसापूर्वीच निवेदन देण्यात आले होते.याबरोबरच आज(गुरुवार)रोजी तहसीलदार जयराज देशमुख यांना डांबर व मिक्सर प्लांट बंद करण्यात यावे याकरिता निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने हा प्लांट मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली असून हा प्लांट बंद न झाल्यास येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर मगर यांच्यासह निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments