सोमनाथ साळुंके
डाबर व मिक्सर प्लांटला विरोध व त्याविरोधात आवाज उठविणाऱ्या तक्रारदार विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यापूर्वीच बिल्डरच्या एका फोनवर तक्रारदार विरोधात तक्रार नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार दिघी पोलीस स्टेशनमध्ये घडल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
कल्याणीनगर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरील अभियंता असलेल्या तरुण तरुणीस दिलेल्या कारच्या धडकेत जीव गमावावा लागला होता.त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असतानाच निरगुडी या ठिकाणी एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाइकाचे निरगुडी येथील गावानजीक गट क्रमांक ११९व १२४ येथील जागेमध्ये डाबर व मिक्सर प्लांट गेल्या काही वर्षापासून सुरू आहे.मात्र संबंधित व्यावसायिकाने निरगुडी ग्रामपंचायत कार्यालयाकडे गोडावून उभारण्याची परवानगी घेतली असताना या परवान्यांच्या नावाखाली डाबर व मिक्सर प्लांटचां गोरखधंदाच व्यावसायिकाने कंपनीच्या माध्यमातून या भागात खुळेआमपणे सुरू केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या ठिकाणी डाबर व मिक्सर प्लांट असल्याने संबंधित कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात धूर व केमिकल मिश्रित पाणी परिसरातून सोडले जात असल्याने यालगत असणाऱ्या शेतीमधील शेतकर्यांनी पिकविलेल्या पिकांना रोगराई पसरून पिके नापीक होत असल्यामुळे येथील शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
संबंधित डाबर व मिक्सर प्लांटला ग्रामपंचायतीची परवानगी असून संबंधित व्यावसायिक ग्रामपंचायतचा कर भरत आहे.__दयानंद कोळी__ग्रामसेवक__निरगुडी ___
याबरोबरच या प्लांटमुळे परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषण होत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनून नागरिकांना दमा,फुफ्फुस यासारख्या भयंकर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत असून कंपणीमधून निघणारे केमिकल मिश्रित सांडपाणी हे ओढ्यात सोडले जात असून हा ओढा इंद्रायणी नदीला जाऊन मिळत असल्यामुळे या पाण्यामुळे नदीचे पाणी देखील दूषित होत आहे.नदीचे असणारे पाणी हे मुके जनावरे पीत आहेत.त्यामुळे जनावरे आजारी पडून ती दगावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.याबरोबरच या परिसरालगत गट क्रमांक १६३हा वनक्षेत्र भाग म्हणून पाहिला जात आहे.त्यामुळे असणाऱ्या वनक्षेत्राचे वातावरण देखील प्रदूषित होत आहे.त्यामुळे संबंधित प्लांट बंद व्हावा या उद्देशाने येथील स्थानिक नागरिक व शेतकरी सुधीर मगर यांनी याविरोधात आवाज उठविला आहे.याकरिता गावकऱ्यांच्या सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली आहे.मात्र ज्या दिवशी मगर व त्यांचे सहकारी येथील प्लांटची पाहणी करण्यास गेले असता.त्यांच्यात संभाषण होऊन याविरोधात दिघी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास आपणास न्याय मिळेल या आशेने प्रथम चर्चा मगर व त्यांचे सहकारी यांच्यात करण्यात आली होती. व त्यांच्या सहकाऱ्यांसह ते पोलीस स्टेशनला पोहचण्याअगोदर संबंधित व्यावसायिकाचे कामगार तेथे हजर राहून मगर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे काम करत होते.त्यामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यांना बिल्डरचा फोन आल्यानंतर माझ्यावर खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचा आरोप मगर यांनी केला आहे.यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात षडयंत्र रचून हा गुन्हा दाखल केला असल्याचे मगर यांनी सांगितले.यासह मगर यांनी देखील संबंधित डाबर प्लांट व्यावसायिक व कंपनी विरोधात दिघी पोलीस स्टेशनला कंपनी तक्रार दिली आहे.याबरोबरच निरगुडीतील गावकऱ्यांना न्याय मिळावा व सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सुहास देवसे यांना निवेदन देण्यात आले असून हा प्लांट बंद करण्याची मागणी निरगुडीकरांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यासह संबंधित डाबर व मिक्सर प्लांट हा जून २०२२मध्ये जिल्ह्याचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तेव्हा दिलासा मिळाला होता.मात्र हा प्लांट पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.याचबरोबर डाबर प्लांट यापूर्वी बंद करण्यात आला असताना देखील तो पुन्हा कोणाच्या परवानगीने सुरू करण्यात आला व यामध्ये ग्रामसेवकांची देखील भूमिका काय?आहे याची देखील चौकशीची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांना प्रत्यक्ष व फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न सिवीक मिररने केला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डाबर प्लांट व्यावसायिकावर कारवाई करण्यात येऊन तो बंद करण्याची मागणी निरगुडी ग्रामस्थ व सुधीर मगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे._____
आमचे शेती हे उत्पांनाचे साधन असून डाबर पलांटमुळे शेतीचे नुकसान होत असून न्याय मिळत नसल्याने याविरोधात मी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर बांधकाम व्यावसायिकाच्या दबावामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.तसेच संबंधित प्लांट हा कोणाच्या वरधह स्तामुळे.पुन्हा सुरू करण्यात आला याबरोबरच ग्रामपंचायतमध्ये संबंधित डाबर प्लांटची कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याने या सर्व विषयांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा.
Post a Comment
0 Comments