पिंपरी_चिंचवड महापालिकेत पाणीपुरवठा विभागात ठेकेदारी मिळून देण्याच्या बहाण्याने पालिका कर्मचाऱ्यांकडून ठेकेदाराची दिड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संदेश शांताराम नडे असे फसवणूक केलेल्या व पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.फिर्यादीने निवेदनात(अर्जात)नमूद केले आहे की,मी ठेकेदार असून पिंपरी_चिंचवड महापालिकेत ठेके मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत असून माझी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या आरोपीचे यापूर्वी भिसी च्या माध्यमातून ओळख होती.त्यामुळे २०२२ते२०२४ या काळात भिसीचे सर्व पैसे घेवून पिंपरी चिंचवड महापालिकेत पाणीपुरवठा विभागात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे टेंडर निघाले असून हे काम मी तुम्हाला मिळून देतो असे मला भासविण्यात आले.त्यादरम्यान आरोपीने माझ्याकडुन जवळपास काम मिळून देण्याच्या बहाण्याने सन २०१४ ते २०२२ याकाळात महिना प्रति ३० हजार रुपये प्रमाणे ९६ महिने भिशी स्वरुपात माझ्याकडुन २८ लाख २८ हजार ८००रुपये माझ्याकडुन घेतले.पण त्यानंतर मला आरोपी कडून कोणत्याही प्रकारचे काम न मिळाले असे नमूद फिर्यादीने अर्जात केले आहे.त्यानंतर मी आरोपीकडून माझ्या पैशाची मागणी केली असता.त्याने पुन्हा माझ्यापुढे बहाणा करून माझ्या मुलास पिंपरी चिंचवड पालिकेत कोरोणा काळात माक्स व सेनेटायाझर वाटपाचे पंचावन्न कोटी रुपयांचे काम मिळाले असून मुलाचे बील मिळाल्यावर तुमची असणारी रक्कम देऊन टाकीन असे मला सांगण्यात आले.त्यानंतर २०२३ ते २०२४ मध्ये संदेश शांताराम नडे यांनी मला पुन्हा पाणीपुरवठा विभागात नवीन पाईप लाईन टाकण्याचे व जुनी पाईप लाईनचे खोदकाम करण्यासाठी जेसीबी,डंपर पुरविण्याचे टेंडर निघाले आहे.या टेंडरची एकूण रक्कम १५ कोटी रुपये असून हे टेंडर तुला मिळून देतो असे मला सांगण्यात आले.त्यामुळे संबंधित काम मला मिळेल या आशेने मी आरोपीला जमीन ,पत्नीचे डाग दागिने गहाण ठेवून तसेच मित्र व नातेवाईक यानकडून हातउसने पैसे घेवून आरोपीस २ ते ३ लाख असे करून २०२२ ते २०२४ या कालावधीत मी त्यांस जवळपास ५३लाख करून दिले.तसेच फिर्यादीनी त्यांचे मित्र दत्रातये चव्हाण यांना पण टेंडर देतो असे भासवून ६८ लाख रुपयांची रक्कम घेतली आहे.मात्र एक ही काम देखील मला न मिळाल्याने आरोपीकडून जवळपास दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली असून सदरची रक्कम मी त्यांच्याकडे मागण्यास गेल्यावर त्यांच्याकडून मला उडवाउडवीची उत्तरे मिळत असून ते फिर्याद सतत पैसे मागत असल्याने आरोपीकडून 5 हजारात खून करणारी माणस माझ्या कडे आहे पैसे देत नाही.अशी मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे भविष्यात माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास पुढील काही घटना घडल्यास आरोपी संदेश शांताराम नडे हे जवाबदार राहतील व यांच्या विरोधात जीवे मारण्याच्या धमकीचा चर्तुःश्रृंगी पोलीस स्टेशन मधे गुन्हाची केली आहे न्याय मागण्याची विनंती करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments