Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

धानोरीत ट्रान्सफॉर्मरला आगनागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

 ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करताना महावितरण चे कर्मचारी
       सोमनाथ साळुंके
शोर्तसर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर जवळ लागलेली आग नागरिकांच्या सतर्कतेमुळे  विझविण्याास अग्नीशामक पथकास यश आले असून सदरचा प्रकार धानोरी येथील महावितरण कार्यालय परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
         महावितरण विभागातर्फे वीज ग्राहकांच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी धानोरी भागात जकात नाका परिसरात महावितरणचे उपकेंद्र उभारण्यात आल्याने या ठिकाणी कामानिमित्त वीजग्राहकांची वर्दळ नेहमीच दिसून येत असते.त्यातच असलेले उपकेंद्र हे पहिल्या मजल्यावर असून येथील तळमजल्यावरच परिसराला वीजपुरवठा करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.सोमवारी मधरात्रीच्या सुमारास बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर खोलीमध्ये शोर्तसर्कीट झाल्यामुळे अचानक धुरांचा लोट बाहेर निघत असल्याचे उपकेंद्रजवळ असलेल्या सोसायटी मधील नागरिकांच्या लक्षात येताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अग्नीशामक केंद्रास यासंदर्भात माहिती दिली.विशेष करून अग्नीशामक केंद्र उपकेंद्राजवळच असल्याने अग्नीशामक दल अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन प्रथम याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांना देऊन परिसरातील वीजपुरवठा खंडीत करून लागलेली आग ही पंधरा ते वीस मिनिटात आटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलास यश आले.या आगीत वीजमीटर व बहुतांश प्रमाणात केबल जळजेली असून या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरपर्यंत आग पोहचली असती तर त्याचा स्फोट होऊन महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन मोठी जिवीतहानी झाली असते.अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये रंगली होती.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक केंद्राचे किरण चौधरी,गणेश केदारी,बापू मुंगसे,संजय कारले, ओमकार गांगड,विकास पालवे,नितीन माने या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यास यश मिळविले.तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्याचे काम महावितरण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता जी.पी.झोपे यांनी सिवीक मिररला बोलताना सांगितले.___
शोर्ट्सरकिटमुळे लागलेल्या आगीत नादुरुस्त वीज मीटर जळाले असून विद्युत केबलचे देखील काही प्रमाणात जळाल्या असून ते दुरुस्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.__जी.पी.झोपे__सहायक अभियंता_धानोरी महावितरण कार्यालय___
नागरिकांनी तात्काळ आगीची माहिती दिल्यावर असलेले उपकेंद्र अग्नीशामक केंद्राजवळ असल्याने आग विझविण्यासाठी वेळ लागला नाही.__रमेश गांगड _सहायक विभागीय अधिकारी__अग्नीशामक केंद्र_धानोरी______

Tags

Post a Comment

0 Comments