महापालिकेकडे प्रस्ताव धूळखात,पालक-पाल्यांना प्रतीक्षा...
पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातील महापालिकेची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शाळा सुरू करण्याचा चर्चेत आलेला प्रस्ताव आता धूळखात पडला आहे. महापालिका आयुक्तांची बदली आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या चर्चेवर शिक्षणाधिकाऱ्यांचे मौन कायम आहे.
त्यामुळे विद्येच्या माहेरघरात महापालिकेच्या सीबीएसई शाळेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी माध्यमाच्या शाळांमधील दिवसेंदिवस घटणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या, त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असणारा पालकांचा ओढा, या धर्तीवर पुणे महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करावी, असा विचार मांडण्यात आला. याबाबत काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
महापालिकेअंतर्गत शाळेसाठी आरक्षित जागेत भवन रचना विभागातर्फे नव्याने शाळा बांधल्या आहेत. नव्याने बांधलेल्या शाळांचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप सुरू झालेल्या नाहीत, अशी स्थिती आहे.
Post a Comment
0 Comments