जबरी चोरी करणारे आरोपी गजाआड,विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी - सोमनाथ साळुंके...
पुणे : फिर्याडीस मारहाण करून त्याच्याकडील असणारी मोटार सायकल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून साठ हजार किमतीची यमाहा मोटार सायकल जप्त करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी खंडेश्वर रामहरी दापकर(वय२१वर्षे, रा.गांजपुर,पो. उंड्री,ता.धारूर,जी.बीड),प्रशांत शिवाजी जंगम(वय २२वर्षे, रा. नाळवडी तालुका व जी.बीड) व अक्षय संतोष जंगम(वय २१वर्षे, रा.कांजवा तालुका केज जी.बीड)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,फिर्यादी हे आपल्या मैत्रिणीसह धानोरी भागातील शंभर एकर जागेमध्ये आपल्या मैत्रिणीसह यमाहा दुचाकीवर आले असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून व हाताने मारहाण करून त्यांच्या जवळ साठ हजर किमतीची असलेली दुचाकी यमाहा चोरून नेली.घटनेनंतर तात्काळ फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,पो. ह. दिपक (भाऊ)चव्हाण,संजय बादरे,संदिप देवकाते,प्रफुल मोरे,किशोर भुसारे यांनी तांत्रिक विश्लेषणव्दारे बातमीदाराकदून माहिती मिळवली असताना सदर जबरी चोरीतील आरोपी हे वाघोली येथील कटकेवाडी परिसरात एका खाजगी कंपनीत हमालीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना कंपनीजवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना आरोपींनी दुचाकी चोरी केल्याचे कबूल करताच त्यांना अटक करण्यात आली
.सदरची कामगिरी ही पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,परिमंडळ४चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर,खडकी विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती आरती बनसोडे,विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव,गुन्हे शाखेचे मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, दिपक चव्हाण,बबन वणवे,यशवंत किर्वे,संपत भोसले,संजय बादरे,संदिप देवकाते,किशोर भुसारे,अक्षय चपटे यांनी केली घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे करत आहे.
Post a Comment
0 Comments