सदर्न कमांड हेडक्वार्टर घरफोडी, साडे चार लाखांचा ऐवज लंपास...
पुणे : भारतीय सैन्याचे सदर्न कमांड मुख्यालय परिसरात असलेल्या दोन घरांमध्ये चोरट्यांनी चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१०) रात्री पावणे दहा ते शनिवारी (दि.११) दुपारी पावणे तीनच्या सुमारास रुम नंबर १२ व ७ मध्ये घडला आहे.
याबाबत ऐष्ली स्टीफेन (वय-३१ रा. वेस्ट ब्लॉक, सदर्न कमांड हेडक्वार्टर कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी ३८०, ४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी रात्री खोलीला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या रुमच्या खीडकीतून आत प्रवेश केला.
चोरट्याने खोलीमधील कपाटातून एक सोन्याचे मंगळसुत्र व एक सोन्याचे कडे चोरले. तसेच फिर्यादी यांच्या जवळील रुम मध्ये राहणाऱे मेजर कमलसिंग नानकसिंह यांच्या रुममधून सोन्याच्या दोन बांगड्या व एक सोन्याची चैन असा मुद्देमाल चोरुन नेला. चोरट्यांनी चार लाख 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. फिर्य़ादी शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास रुमवर आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ लष्कर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.
Post a Comment
0 Comments