शहरातील वाहतुकीत महत्त्वाचा बदल, अनेक रस्ते बंद राहणार...
पुणे : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीसाठी विशेष कुख्यात बनत आहे.
शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अजूनच भर पडत आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरातील अनेक रस्ते उद्यापासून बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौकाजवळ गर्डर लॉचिंग टाकण्याचं काम केलं जाणार असून यासाठी शहरातील काही रस्ते बंद ठेवले जाणार आहेत.
यामुळे शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारून चालत नाही. गर्डर बसवण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी शहरातील काही रस्ते बंद राहणार आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत.
कोणते रस्ते बंद राहणार ?
वीर चाफेकर चौक ते न.ता.वाडी के.बी. जोशीमार्ग चौक ते सिमला ऑफिसचौक (एस.टी. स्टैंड मार्ग) हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी केला जाणार आहे.
वीर चाफेकर उड्डानपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेश बंद राहणार अशी माहिती देण्यात आली आहे.
या कामासाठी फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यासाठीचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
न.ता.वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश देखील बंद राहणार असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स. गो. बर्ने चौकाकडुन सिमला ऑफिस चौकामधुन शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहणार असे सांगितले जात आहे.
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस.टी. स्टैंड सर्कल वरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार अशी माहिती देण्यात आली आहे.
सिमला चौकाकडुन पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल. आय. सी. कडील बाजूने चाफेकर उड्डाण पुलाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वीर वाफेकर चौक ते न.ता.वाडी चौक ते सिमला ऑफिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्कीग राहणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Post a Comment
0 Comments