मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त...
पुणे : मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प जायका शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजनमोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, ऍड वर्षा डहाळे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडके, अपर्णा लोणारे, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, शंतनू खिलारे पाटील, विठ्ठल बराटे, हर्षवर्धन मानकर, दीपक पवार, सचिन थोरात, अजय मारणे, अभिजीत राऊत, संदीप मोरे, आशुतोष वैशंपायन यांचा प्रमुख सहभाग होता.११ नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पमोहोळ म्हणाले, "मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्पात ११ नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ५५ किलोमीटर लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या आणि दररोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता ३९६ दशलक्ष मीटरने एमएलडीने वाढणार आहे.
सन २०४६ मध्ये ९९ लाख लोकसंख्येचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाशिवाय ५०० कोटी रुपये खर्च करून जुन्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अत्याधुनिकरण सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ पैकी दहा प्रकल्पांचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, आयात केलेली विद्युत यंत्रणा पुण्यात पोहोचली आहे. सन २०२५ च्या मध्यास काम पूर्ण होणे अपेक्षित आहे."नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजनमोहोळ पुढे म्हणाले, "नदीकाठ सुशोभिकरण या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी झाले. पहिल्या टप्प्यात येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे 350 मीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला असून, पहिल्या दोन टप्प्यांचे काम सुरू आहे.
Post a Comment
0 Comments