पुणेकरांनो एका डायलवर जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र...
पुणे : महानगरपालिकेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरातील १५ प्रभागांमध्ये, नागरिकांसाठी 'तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या' ही हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. पुण्यात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांचे मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात क्षेत्रिय कार्यालयनिहाय हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
यासह नागरिकांना या सेवेचा वापर करून निवडणुकीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले जात आहेत. पीएमसीने सर्व पुणेकरांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यंदा पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. तिथे पोटनिवडणूक झाली नाही. भाजपने या ठिकाणी आता मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर उभे आहेत.
Post a Comment
0 Comments