पुण्यात उमेदवारालाच लोकसभेसाठी स्वत:ला मतदान करता आले नाही...
पुणे : लोकसभा निवडणुच्या चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. यातच पुण्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ३५.६१ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामुळे सकाळपासून पुणेकरांनी मतदानांना चांगला प्रतिसाद दिला आहे.
अशातच पुणे लोकसभेतील वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना स्वत: साठी मतदान करता आले नाही. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
वंचितकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु असे असताना स्वत: वसंत मोरे यांना मात्र पुणे लोकसभेसाठी स्वत : ला मतदान करता आले नाही. वसंत मोरे हे कात्रजला वास्तव्यास असल्याने शिरूर मतदारसंघात त्यांचे मतदान असल्याने त्यांनी कृष्णाजी मोरे विद्यालयात शिरूरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Post a Comment
0 Comments